Railway Recruitment: रेल्वेत नोकरीची संधी; ३५१८ पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Railway Apprenticeship Recruitment: दक्षिण रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
Railway Recruitment
Railway RecruitmentSaam Tv
Published On
Summary

रेल्वेत नोकरीची संधी

दक्षिण रेल्वेत अप्रेंटिसशिप पदासाठी भरती

३५१८ पदांसाठी होणार भरती

रेल्वेमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. दक्षिण रेल्वेत सध्या विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. दक्षिण रेल्वेत अप्रेंटिसशिप पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. रेल्वेत ज्या उमेदवारांना नोकरी करायची आहे त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

Railway Recruitment
Tejashri Pradhan Job: अभिनय करण्यापूर्वी तेजश्री प्रधान या क्षेत्रात करायची काम

दक्षिण रेल्वेत तब्बल ३५१८ पदांसाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २५ ऑगस्टपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत. या नोकरीसाठी तुम्ही २५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करु शकतात.

शैक्षणिक पात्रता (Education Qualification)

दक्षिण रेल्वेतील या नोकरीसाठी उमेदवारांनी मान्याताप्राप्त विद्यापीठातून दहावी आणि बारावी पास असणे गरजेचे आहेत. त्यांना ५० टक्के गुण मिळालेले असावे. याचसोबत उमेदवारांकडे आयटीआय सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे.

सर्व ट्रेडमध्ये अप्रेंटिसशिप पदासाठी कालावधी वेगवेगळा असणार आहे. वेल्डर अप्रेंटिसशि पदासाठी १ वर्ष ३ महिने, फिटर आणि पेंटर पदासाठी २ वर्षे आणि मेडिकल लॅब टेक्निशियन पदासाठी १ वर्ष तीन महिन्याचा कालावधी असणार आहे.

स्टायपेंड

दहावी पास तरुणांना या नोकरीसाठी ६००० रुपये स्टायपेंड मिळणार आहे. १२वी पास तरुणांना ७००० रुपये आणि आयटीआय उत्तीर्ण तरुणांना ७००० रुपये स्टायपेंड मिळणार आहे.

Railway Recruitment
Freshers Job Hiring : IT फ्रेशर्ससाठी सुवर्णसंधी! इन्फोसिसकडून २०,००० पदांसाठी भरती

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा २५ ते २२ वर्षे असावी.राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला १०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

Railway Recruitment
Sleep Job Offer: '9 तास झोपा अन् 10 लाख कमवा'; प्रसिद्ध कंपनीची भन्नाट ऑफर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com