NTPC Recruitment Saam Tv
naukri-job-news

NTPC Recruitment: NTPC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू; मिळणार ५०,००० रुपये पगार;जाणून घ्या सविस्तर

NTPC Recruitment 2024: NTPC मध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ ऑगस्ट आहे. या नोकरीसाठी उमेदवारांना भरघोस पगार मिळणार आहे.

Siddhi Hande

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन मायनिंग लिमिटेडमध्ये अनेक पदांसाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी अर्ज प्रक्रिया १७ जुलैपासून सुरू झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ ऑगस्ट २०२४ आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करा. याबाबत सर्व माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन मायनिंग लिमिटेडमध्ये एकूण १४४ जागांसाठी भरती केली जाणार आहे.एनटीपीसीमध्ये नॉन-एग्जीक्यूटिव्हमध्ये पदभरती केली जाणआर आहे. यामध्ये विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. यामध्ये मानिंग ओवरमॅनमध्ये ६७ पदे, मॅग्जीन इनचार्जसाठी ९ पदे, मेकॅमिक पर्यवेक्षकासाठी २८ पदे, इलेक्ट्रिकल पर्यवेक्षकासाठी २६ पदे, व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्ट्रकटर पदासाठी ८ पदे भरती केली जाणार आहे.

या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. यासाठी ntpc.co.in या वेबसाइटला तुम्हाला भेट द्यावी लागणार आहे. याबाबत माहिती वेबसाइटवर दिली आहे. या पदासाठी शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा वेगवेगळी आहे.या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने डिप्लोमा केलेला असणे गरजेचे आहे. १८ ते ३० वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ३०० रुपये फी भरावी लागणार आहे. तर एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.या नोकरीसाठी उमेदवारांना परीक्षा द्यावी लागणार आहे. यामध्ये कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट द्यावी लागेल. त्यानंतर कौशल्य चाचणी घेतली जाईल. त्यानंतर कागदपत्रे पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी केली जाईल.

या नोकरीसाठी वेतन पदानुसार देण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांना जवळपास ४०,००० ते ५०,००० रुपये मासिक वेतन देण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! कोणत्याही कोचिंगशिवाय दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS सलोनी वर्मा आहेत तरी कोण?

Viprit Rajyog: 365 दिवसांनंतर शुक्राने तयार केला विपरीत राजयोग; 'या' राशींचा गोल्डन टाइम होणार सुरु

Friday Horoscope : लग्न जुळणार, नोकरीचा प्रश्न मिटणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

Todays Horoscope: 'या' नोकरीमध्ये काही बदल होण्याची शक्यता; जाणून घ्या राशीभविष्य

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

SCROLL FOR NEXT