Metro Job Saam Tv
naukri-job-news

Metro Job: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मेट्रोत भरती सुरु, पगार २.८० लाख, पात्रता अन् अर्जप्रक्रिया काय? जाणून घ्या सविस्तर

Noida Metro Recruitment: मेट्रोत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. नोएडा मेट्रोत सध्या जनरल मॅनेजर पदासाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी तुम्हाला भरघोस पगार मिळणार आहे.

Siddhi Hande

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नोएडा मेट्रोत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. त्यामुळे तुम्हाला चांगल्या कंपनीत मोठ्या पगाराची नोकरी मिळणार आहे. नोएडा मेट्रोत जनरल मॅनेजर आणि सिविल या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. नोएडा मेट्रोच्या या नोकरीबाबत अधिकृत वेबसाइटवर माहिती देण्यात आली आहे.

नोएडा मेट्रोतील या नोकरीसाठी तुम्ही www.nmrcnoida.com या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १० मार्च २०२५ आहे. त्यानंतर अर्जप्रक्रिया बंद होईल.

नोएडा मेट्रोतील जनरल मॅनेजर ऑपरेशन्स पदासाठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल/मैकेनिकल/इलेक्ट्रॉनिक्स एंड टेलीकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स एंड कम्युनिकेशन/इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजनियरिंगमध्ये पदवी प्राप्त केलेली असावी.

जनरल मॅनेजर पदासाठी बॅचलर डिग्री असणे आवश्यक आहे. तसेच १७ वर्षांचा कामाचा अनुभव असायला हवा. याबाबत सविस्तर माहिती तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ५६ वर्षे असावी. याचसोबत निवड झालेल्या उमेदवारांना १,२०,,००० ते २,८०,००० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड त्यांची योग्यता आणि अनुभवाच्या आधारे केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना फॉर्म आणि कागदपत्रे द जनरल ममॅनेजर, फायनान्स अँड एचआर, सेक्टर २९, नोएडा २०१३०१ येथे पाठवायचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी; भाजपमध्ये मोठा फेरबदल; अनेक नेत्यांची होणार उचलबांगडी, राजकीय उलथापालथ होण्यामागे कारण काय?

Maharashtra News Live Update: कराड शहर पोलिसांची मोठी कारवाई, 95.78 ग्रॅम एमडी ड्रग जप्त

Veen Doghatli hi Tutena: 'वीण दोघातली ही तुटेना'मध्ये मोठा ट्विस्ट! चिंगीच्या गरोदरपणाचं सत्य समोर; स्वानंदी मोडणार अंशुमनचं लग्न?

विषारी दारू प्रकरणात मृतांच्या कुटुंबांना ५ लाखांची मदत; फडणवीस सरकारची घोषणा

मुंबईत ८२ इमारती अतिधोकादायक; २७३६ रहिवाशांचे जीव धोक्यात

SCROLL FOR NEXT