NMDC Recruitment Saam Tv
naukri-job-news

NMDC Recruitment: NMDC मध्ये या पदांसाठी सुरु आहे भरती; मिळणार भरघोस पगार; आजच अर्ज करा

NMDC Recruitment 2024: नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. कंपनीत वेगवेगळ्या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या.

Siddhi Hande

नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी कंपनीकडून जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एक्झिक्युटिव्ह या पदासाठी ही भरती घेण्यात येणार आहे. या पदासाठी ८१ जागा रिक्त आहे. या नोकरीसाटी तुम्हाला ऑलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल. या पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयाटी अट अशी सर्व माहिती जाहिरातीमध्ये देण्यात आली आहे.

एनएमडीसीसारख्या मोठ्या कंपनीत काम करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. १८ जुलै २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. एनएमडीसी कंपनीत सिव्हिल खात्यात ९ पदे भरती करण्यात येणार आहेत. मेकॅनिकल खात्यात ५ तर पर्सनल (Personnel)खात्यात २१ रिक्त पदे आहेत. इलेक्ट्रिकल खात्यात ३, मटेरियल मॅनेजमेंट खात्यात १ जागा रिक्त आहे. कॉम्प्युटर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी खात्यात ४ रिक्त जागा तर पर्यावर खात्यात २ जागा रिक्त आहे. एक्झिक्युटीव्ह या पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून डिप्लोमा/ डिग्री/ B.E/B.Tech/एमबीए, एमसीए पदवी प्राप्त उमेदवार अर्ज करु शकतात.या नोकरीसाठी वेगवेगळ्या डिपार्टमेंटनुसार वेतन देण्यात येणार आहे. नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला www.nmdc.co.in या वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: ४ बहिणींवर बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट, आरोपीकडून मेहुण्याची हत्या, मृतदेह घराजवळ पुरला

Maharashtra Live News Update: सोलापूर-कोल्हापूर महामार्ग बंद, तिऱ्हे पूल पाण्याखाली

Solapur Flood News : महामार्ग बंद; लालपरीची चाके थांबली, वंदे भारत एक्सप्रेस ठप्प, सोलापूरमध्ये अतिवृष्टीमुळे मेगाहाल

Gold Rate Today: सुवर्णनगरीत सोन्याने उच्चांक गाठला; नवरात्रीच्या पहिल्या दोन दिवसात ३००० रुपयांची वाढ

Mysore Pak Recipe : हलवाई स्टाइल मैसूर पाक, नवरात्रीत देवीला दाखवा खास नैवेद्य

SCROLL FOR NEXT