Government Job Saam Tv
naukri-job-news

Government Job : सरकारी नोकरीची चांदी, महिना २००००० रुपये पगार,कुठे निघाली भरती? पात्रता काय? जाणून घ्या

National Seeds Corporation Limited Recruitment: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. राष्ट्रीय बियाणे महामंडळात मॅनेजर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. राष्ट्रीय बियाणे महामंडळात नोकरीची सुवर्णसंधी आहे. राष्ट्रीय बियाणे महामंडळात विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. राज्य सरकारअंतर्गत नोकरी करण्याची ही चांगली संधी आहे.

राष्ट्रीय बियाणे महामंडळात तब्बल १८८ रिक्त जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात अर्ज करावेत. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२४ आहे. (Government Job)

राष्ट्रीय बियाणे महामंडळात डेप्युटी जनरल मॅनेजर, असिस्टंट मॅनेज, मॅनेजर ट्रेनी, सिनियर ट्रेनी आणि ट्रेनी पदासाठी भरती जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्हाला सरकारी विभागात मॅनेजर होण्याची संधी तुमच्याकडे आहे. या नोकरीसाठी उमेदवारांनी मुदतीपूर्वी अर्ज करावेत.

राष्ट्रीय बियाणे महामंडळातील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी प्राप्त केलेली असावी. (B.E/B.Tech/M.Tech/M.E/MCA/M.Sc (Agri), B.Sc/B.Sc (Agri)) पदवी प्राप्त उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

राष्ट्रीय बियाणे महामंडळातील या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.डेप्युटी जनरल मॅनेजर पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना ७०,००० ते २,००,००० रुपये वेतन मिळणार आहे. तर असिस्टंट मॅनेजर पदासाठी १,४०,००० रुपये पगार मिळणार आहे. (National Seeds Corporation Limited Recruitment)

डेप्युटी मॅनेजर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ५० वर्ष असावे. असिस्टंट मॅनेजर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ३० वर्ष असावी. या नोकरीसाठी उमेदवाराची निवड कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट, त्यानंतर कागदपत्रे पडताळणी आणि इंटरव्ह्यूद्वारे केली जाणार आहे.(National Seeds Corporation Limited)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress : बेडरूम अन् इंटीमेट सीन; कट म्हटलं तरी हिरोला Kiss करत राहिली प्रसिद्ध अभिनेत्री, नेमकं घडलं काय?

Maharashtra News Live Update: महायुतीकडून भाजपाचे अमर राजुरकर यांना उमेदवारी

OBC आरक्षणात कपात होणार? निवडणूक आयोगाचे राज्य सरकारला आदेश, पाहा का घेतला निर्णय?

Vaibhav suryavanshi: 15 वर्षांचा वैभव सूर्यवंशी मालामाल, आलिशान कार आणि मिळाले तब्बल इतके लाख रूपये

Ladki Bahin Yojana : मे महिना संपला; लाडकीच्या खात्यात ₹१५०० कधी येणार? अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT