National Education Day, राष्ट्रीय शिक्षण दिन Saam Tv
naukri-job-news

National Education Day : 11 नोव्हेंबरलाच का साजरा केला जातो राष्ट्रीय शिक्षण दिन, महत्त्व आणि इतिहास

National Education Day 2024 Importance and history : सर्वप्रथम 11 नोव्हेंबर 2008 रोजी सुरू झाले, त्यानंतर दरवर्षी हा दिवस साजरा केला जाऊ लागला.

Namdeo Kumbhar

National Education Day 2024 : शिक्षण हा समाजाचा पाया आहे. एखादा समाज किंवा देश किती प्रगतीशील आणि सुसंस्कृत आहे, ते त्याच्या शैक्षणिक स्थरावरून ठरवता येते. याच शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी भारतात दरवर्षी 11 नोव्हेंबरला राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा केला जातो. हा दिवस साजरा करणे सर्वप्रथम 11 नोव्हेंबर 2008 रोजी सुरू झाले, त्यानंतर दरवर्षी हा दिवस साजरा केला जाऊ लागला. या दिवशी देशभरात शिक्षणाबाबत जनजागृती केली जाते. शाळा,कॉलेज,शैक्षणिक संस्थांमध्ये हा दिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. राष्ट्रीय शिक्षण दिनाच्या निमित्त्याने आपण त्याचा इतिहास आणि महत्त्व जाणून घेऊया. (National Education Day 2024 Importance and history)

राष्ट्रीय शिक्षण दिनाची सुरूवात कशी झाली? (History Of National Education Day)

स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद हे होते. ते  5 ऑगस्ट 1947 ते 2 फेब्रुवारी 1958 पर्यंत ते भारताचे शिक्षण मंत्री होते. मौलाना आझाद यांनी शैक्षणिक क्षेत्रात अभूतपूर्व योगदान दिले आणि त्यांच्या कार्यकाळात विविध साहित्य अकादमी, ललित कला अकादमी, संगीत नाटक अकादमी यांची स्थापना झाली. यासोबतच त्यांच्या कार्यकाळात सांस्कृतिक संबंध परिषदेची स्थापना करण्यात आली. 11 नोव्हेंबरला त्यांची जयंती असते. त्यांनी केलेल्या कार्याचे कौतुक करण्यासाठी या दिवसाची सुरुवात करण्यात आली.

मौलाना अबुल कलाम आझाद यांच्याबद्दल थोडक्यात 

मौलाना अबुल कलाम आझाद हे महान स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ज्ञ, पत्रकार आणि उत्कृष्ट लेखक होते. त्यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1888 रोजी झाला. ते गांधीजींचे समर्थक होते. स्वातंत्र्यापासून पुढील 10 वर्षे त्यांनी शिक्षणमंत्रीपद भूषवले. 1952 मध्ये ते उत्तर प्रदेशातील रामपूरमधून पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले. या महान शिक्षणतज्ज्ञाचे 22 फेब्रुवारी 1958 रोजी निधन झाले.

राष्ट्रीय शिक्षण दिनाचे महत्त्व (Importance of National Education Day)

प्रत्येकासाठीच शिक्षण खूप महत्वाचे आहे. व्यक्ती आणि समाज या दोन्हींच्या घडणीत शिक्षणाची भूमिका महत्त्वाची असते. लोकांना शिक्षणाबद्दल अधिकाधिक जागरूकता यावी आणि प्रत्येकाने शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामील व्हावे हा राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश आहे. देशाचे भविष्य उज्वल करण्यासाठी भारत सरकार 6 वर्षे ते 14 वर्षे सक्तीचे आणि मोफत शिक्षणाची मोहीम राबवत आहे. राष्ट्रीय शिक्षण दिनाचे उद्दिष्ट भारतातील सर्व शाळा,महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्था बळकट करून शिक्षणाचा दर्जा सुधारणे हा आहे. 

NSG90

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Pune Couple Video: दुचाकीवर प्रेमीयुगुलांचे अश्लील चाळे; प्रेमीयुगुलांचा व्हिडिओ व्हायरल

Govt Officials Caught In Bar: शासन 'बार'च्या दारी ; बिअरबारमध्ये सरकारी काम, उपराजधानीतल्या कारभारावरुन हल्लाबोल

Pune Rave Party: पोलिसांनीच कोकेन ठेवलं; 'दृश्यम'प्रमाणे चित्र रंगवलं अन् व्हिडीओ बनवला, असीम सरोदेंचा दावा

Nag Panchami Wishes 2025 : नागपंचमीनिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या भक्तीमय शुभेच्छा

Divya Deshmukh : गँडमास्टर दिव्या देशमुखचं फडणवीसांकडून कौतुक, व्हिडीओ कॉलद्वारे दिल्या शुभेच्छा

SCROLL FOR NEXT