NABARD Recruitment Saam tv
naukri-job-news

NABARD Recruitment: खुशखबर! नाबार्डमध्ये ग्रेड ए ऑफिसर पदांसाठी भरती; ८ नोव्हेंबरपासू करता येणार अर्ज; वाचा सविस्तर

NABARD Recruitment 2025: नाबार्डमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. नाबार्डमध्ये सध्या विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीबाबत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. नाबार्ड म्हणजेच नॅशनल बँक फॉर अॅग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट बँकत भरती जाहीर केली आहे. नाबार्डमध्ये ग्रेड ए पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी अधिसूचनादेखील जाहीर करण्यात आली आहे.

नाबार्डने जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार, या नोकरीसाठीची अर्जप्रक्रिया ८ नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२५ असणार आहे. या नोकरीसाठी तुम्ही www.nabard.org या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत. (NABARD Recruitment)

पात्रता (Education Qualification)

नाबार्डमधील भरती मोहिमेत अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी.याचसोबत ग्रॅज्युएशन/ पोस्ट ग्रॅज्युएशन/ एमबीए/पीजीडीएम/ सीए/ सीएस/ आयसीडब्ल्यूए पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी २१ ते ३० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.

नाबार्डमधील भरती मोहिमेत एकूण ९१ पदांसाठी भरती केली जाणार आहे. या असिस्टंट मॅनेजर ग्रॅड ए (Rural Development Banking Service/RDBS) साठी ८ जागा रिक्त आहेत.असिस्टेंट मैनेजर Grade ‘A’ (Legal Service) पदासाठी २ जागा रिक्त आहेत.असिस्टेंट मॅनेजर Grade ‘A’ (Protocol & Security Service) 4 पदे भरती केली जाणार आहे.

या भरती मोहिमेत अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ८५० रुपये फी भरावी लागणार आहे. या नोकरीसाठी राखीव प्रवर्गातील उमेदवारांना १५० रुपये शुल्क भरायचे आहेत.

अर्ज कसा करावा? (Application Process)

या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला nabard.org या वेबसाइटवर जायचे आहे.

यानंतर Career Notices वर क्लिक करायचे आहे.

यानंतर Apply Here वर क्लिक करा.

यानंतर Click here for New Registration वर जाऊन रजिस्ट्रेशन करायचे आहे.

यानंतर तुमची माहिती, सही आणि फोटो टाकायचा आहे.

यानंतर अर्ज सबमिट करण्यापूर्वी प्रिंट आउट काढून ठेवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur-Karjat : बदलापूर-कर्जतसाठी मोदींनी घेतला मोठा निर्णय, लोकल प्रवास होणार सुसाट, मुंबई-पुणेकरांसाठीही फायदा

Maharashtra Live News Update : पुण्यात दिवसा ऊबदार वातावरण, पहाटे कडाक्याची थंडी

Shani Gochar 2026: 2026 साली या राशींचं भाग्य उजळणार; नवी नोकरी पैसा मिळून तुम्ही होणार करोडपती

Gold Rate Prediction: सोन्यात आता ५ लाख गुंतवले तर २०३० मध्ये किती रिटर्न मिळणार? वाचा कॅल्क्युलेशन

Sangli Politics : सांगलीत प्रचारादरम्यान हायव्होल्टेज ड्रामा, दोन गट आपापसात भिडले; राष्ट्रवादीच्या नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT