NABARD Recruitment Saam tv
naukri-job-news

NABARD Recruitment: नाबार्डमध्ये नोकरीची संधी; असिस्टंट मॅनेजर पदासाठी भरती जाहीर; अर्जप्रक्रिया जाणून घ्या

NABARD Recruitment 2025: नाबार्डमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. असिस्टंट मॅनेजर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

नाबार्डमध्ये नोकरीची संधी

९२ पदांसाठी भरती

असिस्टंट मॅनेजर पदावर काम करण्याची संधी

नाबार्डमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. नॅशनल बँक फॉर अॅग्रीकल्चर अँज रुरल डेव्हलपमेंटमध्ये भरती जाहीर करण्यात आली आहे. नाबार्डमध्ये असिस्टंट मॅनेजर पदासाठी भरती होणार आहे. ग्रेड ए पदांसाठी तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. (NABARD Recruitment News)

नाबार्डमधील या नोकरीसाठी ऑनलाइन अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करायचे आहेत.या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२५ आहे. त्यामुळे इच्छुकांनी त्याआधी अर्ज करावेत.

नाबार्डमधील या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. तुम्हाला www.nabard.org या वेबसाइटवर जाऊन फॉर्म भरायचा आहे.

नाबार्डमधील या नोकरीसाठी एकूण ९२ पदांसाठी भरती केली जाणार आहे.यामध्ये असिस्टंट मॅनेजर ग्रेड ए (रुरल डेव्हलपमेंट बँकिंग सर्व्हिस)मध्ये ८५ पदांसाठी भरती केली जाणार आहे. असिस्टंट मॅनेजर लीगल सर्व्हिस २ जागा रिक्त आहेत. असिस्टंट मॅनेजर (प्रोटोकॉल अँड सिक्युरिटी सर्व्हिस) पदासाठी ४ जागा रिक्त आहेत.

असिस्टंट मॅनेजर ग्रेड ए पदासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, एमबीए, सीए पदवी प्राप्त केलेली असावी. २१ ते ३० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

अर्जप्रक्रिया (NABARD Recruitment Application)

नाबार्डमधील नोकरीसाठी ibpsreg.ibps.in/nbardamoct25/ या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत.

सर्वात आधी न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचे.

यानंतर तुम्हाला माहिती, सही आणि फोटो अपलोड करायचा आहे.

यानंतर फॉर्म भरुन सबमिट करायचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Late periods causes: मार्च महिन्यात मासिक पाळी का येते उशीरा? डॉक्टरांनी सांगितलं यामागील कारण

Maharashtra Live News Update : बुलढाणातील चिखलीत रेणुका देवीची वहन मिरवणूक सुरू; हजारो भाविकांची गर्दी

Mosquito Solution: ना कॉइल, ना स्प्रेची गरज, २ मिनिटांत डास होतील गायब; वाचा सोपी ट्रिक

सोलापूर-धुळे महामार्ग जाम, 10 ते 15 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांब रांगा|VIDEO

Healthy Skin Tips: पिंपल्स आणि ओपन पोर्सपासून सुटका हवी? मग न विसरता या ७ गोष्टी प्रत्येक मुलीने नक्की फॉलो करा

SCROLL FOR NEXT