MUCBF Recruitment Saam Tv
naukri-job-news

MUCBF Recruitment:महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन लिमिटेडमध्ये नोकरीची संधी;लिपिक पदासाठी सुरु आहे भरती;असा करा अर्ज

Maharashtra Urban Co-Operative Bank Federtion Limited: महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक फेडरेशनमध्ये लिपिक पदासाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

Siddhi Hande

महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन लिमिटेडमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. ज्युनिअर लिपिक पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन लिमिटेडमध्ये १२ पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहेत. याबाबत बँक फेडरेशन लिमिटेडने जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ सप्टेंबर २०२४ आहे.

महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन लिमिटेडमध्ये लिपिक पदांसाठी नोकरीची संधी आहे. जळगाव, नाशिक, बुलढाणा, छत्रपती संभाजी नगर, धुळे येथे नोकरीचे ठिकाण आहे. या नोकरीसाठी २२ ते ३५ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.

महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन लिमिटेडमध्ये नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड परिक्षेद्वारे केली जाणार आहे. ही परीक्षा २२ सप्टेंबर २०२४ आहे. या नोकरीसाठी परीक्षेसाठी तुम्हाला अॅड.एस.ए. बाहेती महाविद्यालय कॉमर्स कॉलेज, जळगव येथे उपस्थित राहायचे आहे. याबाबत माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

या नोकरीबाबत सर्व माहिती https://www.mucbf.in/ वेबसाइटवर देण्यात आली आहे. नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी. तसेच MS-CIT चा कोर्स केलेला असावा. नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवारांना१,२८० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

SCROLL FOR NEXT