MSRTC Recruitment Saam Tv
naukri-job-news

MSRTC Recruitment: १०वी पास तरुणांना सरकारी नोकरीची संधी; एसटी महामंडळात भरती सुरु;४४६ रिक्त जागा; अर्ज कसा करावा?

MSRTC Recruitment 2025: एसटी महामंडळात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्यासाठी आहे. एसटी महामंडळात सध्या विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. नाशिक येथे ही भरती केली जाणार आहे.

Siddhi Hande

एसटी महामंडळात नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने नवीन भरती जाहीर केली आहे. यासाठी जाहिरातदेखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. एसटी महामंडळात ४४६ रिक्त पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. (MSRTC Recruitment)

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात १०वी/पदवीधर/ आयटीआय उत्तीर्ण उमेदवार अर्ज करु शकतात. MSRTC द्वारे या भरतीच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आली आहे.

एसटी महामंडळात व्होकेशनल (अकाउंट्स आणि ऑडिटिंग), मॅकेनिक मोटार व्हेईकल, शिटमेटल वर्कर, मेकॅमिक ऑटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, वेल्डर, पेंटर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने १०वी पास असणे गरजेचे आहे. याचसोबत संबंधित क्षेत्रात आयटीआय प्रमाणपत्र प्राप्त केलेले असावे.

एसटी महामंडळातील या नोकरीसाठी १४ ते ३० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.या नोकरीसाठीचे ठिकाण महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, नाशिक विभाग असणार आहे. तुम्हाला नाशिकमध्ये जावे लागणार आहे.या नोकरीसाठी तुम्हाला अर्ज सादर करताना अर्जासोबतच तुमचे शैक्षणिक प्रमाणपत्र द्यावे.

या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला https://www.apprenticeshipindia.gov.in/ या वेबसाइटवर आधी रजिस्टर करावे लागेलय त्यानंतर तुम्हाला अर्ज पाठवावा लागेल. १७ मार्च २०२५ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धोरणात हिंदी, भाषणात मराठी, ठाकरे गटाचा दुटप्पीपणा जनतेला मान्य नाही - बावनकुळे

Sushil Kedia: काल म्हणाला मराठी बोलणार नाही, आज सुतासारखा सरळ झाला; सुशील केडीया म्हणाला मराठी फडाफडा बोलेल, पाहा VIDEO

Sai Tamhankar : बिनधास्त सईचा स्वॅग लय भारी, पाहा हटके PHOTOS

Vijay Melava: मी अनेक गोष्टी बोललो तर बोलायला जागा राहणार नाही; राज ठाकरेंच्या टीकेला दरेकरांचं प्रत्युत्तर

Marathi Bhasha Vijay: मनसेचा दणका! राज ठाकरे माझे हिरो आहेत – सुशील केडियाचा माफीनामा|VIDEO

SCROLL FOR NEXT