MSRTC Recruitment Saam Tv
naukri-job-news

MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी; ३६७ पदांसाठी होणार भरती; अर्ज कसा करावा?

MSRTC ST Mahamandal Bharti: एसटी महामंडळात नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. एसटी महामंडळात सध्या इलेक्ट्रिशियन, कारपेंटर अशा विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे.

Siddhi Hande

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. एसटी महामंडळात सध्या भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. एकूण ३६७ पदांसाठी ही भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठीची जाहिरात विभाग नियंत्रक, राज्य परिवहन महामंडळद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. (MSRTC Recruitment)

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळातील या नोकरीसाठी ITI/ अभियांत्रिकी पदवीधर/ पदविकाधारक उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. प्रशिक्षणार्थी पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. प्रशिक्षणाचे ठिकाण नाशिक येथे असार आहे.

अभियांत्रिकी पदवीधर, मॅकेनिकस मोटार व्हेईकल, शिटमेटल वर्कर, मॅकेनिक अॅटो इलेक्ट्रीकल अँड इलेक्ट्रॉनिक्स,वेल्डर (गॅस अँड इलेक्ट्रीक), पेन्टर, मॅकेनिक डिझेल, इलेक्ट्रॉनिक्स मॅकेनिक, मॅकेनिक (रेफिजरेशन अँड एअर कंडिशनिंग),इलेक्ट्रिशियन, फिटर, टर्नर, कारपेंटर या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. १४ ते ३० वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करायचा आहे.

या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ ऑगस्ट २०२५ आहे. इच्छुकांनी सर्वात आधी www.apprenticeshipindia.gov.in या वेबसाइटवर जाऊन रजिस्ट्रेशन करायचे आहे.यानंतर तुम्हाला वेबसाइटवर अर्ज करायचा आहे. शिकाऊ उमेदवारांच्या निवडीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन, विभागीय कार्यालय, एन.डी.पटेल रोड,शिंगाडा तलाव नाशिक येथे तुम्हाला अर्ज नमुना मिळणार आहे. त्यानंतर तो भरुन सबमिट करायचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fitness Diet: ओमलेट की उकडलेले अंडे? वजन कमी करण्यासाठी योग्य पर्याय कोणता?

Maharashtra Live News Update: धाराशिव जिल्ह्यात अनेक ठिकाणी रात्रभर जोरदार पाऊस

Crime News: भयंकर! नवऱ्यानं पत्नीला मोमोजमधून ड्रग्ज दिलं, मित्रासोबत बलात्कार केला अन् रस्त्यावर फेकलं

Tuljabhavani Temple : शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी देवीच्या मंचकी निद्रेला आजपासून प्रारंभ

Solapur Heavy Rain : सोलापुरात मुसळधार; पुलावरून वाहणाऱ्या पाण्यात टाकली रिक्षा, चालक गेला वाहून

SCROLL FOR NEXT