Government Job Saam Tv
naukri-job-news

Government Job: तरुणांना १ लाख ४० हजार पगाराच्या नोकरीची संधी; अर्ज कुठे अन् कसा कराल? सविस्तर वाचा

Ministry Of Telecommunication Recruitment: दूरसंचार मंत्रालयात नोकरीची सुवर्णसंधी आहे. दूरसंचार मंत्रायलात विविध पदांसाठी भरती सुरु आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरी करण्याची अनेक तरुणांची इच्छा असते. सध्या दूरसंचार मंत्रालयात भरती सुरु आहे. त्यामुळे सरकारी नोकरी करण्याचे तुमचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. दूरसंचार मंत्रालयात वेगवेगळ्या पदांसाठी भरती केली जाणार आहे.

ज्युनिअर अकाउंटंट, लोवर डिवीजन क्लर्क, पर्सनल सेक्रेटरी, स्टेनोग्राफर आणि मल्टी टास्किंग स्टाफ या पदासाठी ही भरती करण्यात येणार आहे.या नोकरीसाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. dot.gov.in या वेबसाइटवर जाऊन फॉर्म डाउनलोड करायचा आहे. त्यानंतर हा फॉर्म दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑक्टोबर २०२४ आहे.

दूरसंचार मंत्रालयात २७ जागांसाठी ही भरती होणार आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी मुदतीपूर्वीच अर्ज करावा.

ज्युनिअर अकाउंटंटसाठी ९ पदे भरण्यात येणार आहे. लोवर डिवीजन क्लार्कसाठी १५ पदे, पर्सनल सेक्रेटरीसाठी १ पद, स्टेनोग्राफर पदासाठी १ पद, मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी १ पद भरण्यात येणार आहे.

या नोकरीसाठी कमाल वयोमर्यादा ५६ वर्ष आहे. याबाबत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी उमेदवारांना २९,२०० ते १,४२,००० रुपयांपर्यंत पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला अर्ज जॉइंट कंट्रोलर ऑफ कम्युनिकेशन अकाउंट्स, ऑफिस कंट्रोलर ऑफ कम्युनिकेशन अकाउंट्स, महाराष्ट्र आणि गोवा, बीएसएनएस अॅडमिनिस्ट्रटिव्ह बिल्डिंग, तिसरा मजला, जूहू रोड, सांताक्रूझ, मुंबई येथे अर्ज पाठवायचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : सोलापूर उत्तर मधून विजयकुमार देशमुख आघाडीवर

Amruta Khanvilkar Birhtday: 'वाजले की बारा ते चंद्रा'; त्या एका निर्णयाने अमृता खानविलकरचं नशीब पालटलं

Horoscope Today: तूळ राशीच्या लोकांना आज जीवनसाथीकडून सहकार्य मिळेल, वाचा तुमचे राशिभविष्य

Assembly Election Results : भाजप कार्यालयाबाहेर जय्यत तयारी, पाहा Video

Horoscope Today: कोणत्या राशींसाठी आजचा दिवस असेल भाग्यशाली, वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT