Mahavitaran Recruitment Google
naukri-job-news

Mahavitaran Recruitment: महावितरण विभागात नोकरीची संधी; शिकाऊ पदांसाठी सुरु आहे भरती; जाणून घ्या सविस्तर

Mahavitaran Recruitment 2024: महावितरण विभागात नोकरीची सुवर्णसंधी आहे. महावितरणमध्ये इंजिनियरिंग अप्रेंटिस पदासाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी पात्रता आणि अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या.

Siddhi Hande

महावितरण गोंदिया कार्यालयात नोकरीची संधी आहे. गोंदिया येथील महावितरण कार्यालयात इंजिनियरिंग अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. २१ जागांसाठी ही भरती होणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

महावितरण अप्रेंटिस पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ सप्टेंबर २०२४ आहे. या नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिग्री किंवा डिप्लोमा केलेला असावा. या नोकरीसाठी १८ ते ३० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.

ज्या तरुणांचे नुकतेच शिक्षण पूर्ण झाले आहेत आणि नोकरीच्या शोधात आहेत. त्यांच्यासाठी ही मोठी संधी आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरावे लागणार नाही. गोंदिया येथे नोकरीचे ठिकाण असणार आहे.

या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला nats.education.gov.in या वेबसाइटवर जाऊन नोंदणी करायची आहे. त्यानंतर नोंदणी करायची आहे.त्यानंतर आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज जमा करायचा आहे. ९ सप्टेंबरपूर्वी तुम्ही अर्ज करायचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कोरड्याठाक मराठवाड्यात रोजगारावर संकट, नवरात्रीपूर्वीच शेतमजूरांवर स्थलांतराची वेळ

Rice Manchurian Recipe: उरलेल्या भातापासून घरी बनवा टेस्टी स्पायसी राईस मंचुरियन, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: राज ठाकरे MPSC आंदोलकांच्या भेटीला

सहकार क्षेत्रातील दिग्गज नेता हरपला; शरद पवार गटातील विश्वासू नेत्याचं निधन

cooking oil storage : ओट्यावर तेल नेहमी सांडत? मग, या ठिकाणी ठेवा तेलाची बाटली, तेल होणार नाही कधीच खराब

SCROLL FOR NEXT