Homeguard Bharti Saam Tv
naukri-job-news

Homeguard Bharti 2024: महाराष्ट्र होमगार्ड भरती लवकरच होणार सुरु;पात्रता आणि प्रवेशाचे निकष काय? जाणून घ्या...

Maharashtra Homeguard Bharti: महाराष्ट्र होमगार्ड भरती जाहीर करण्यात आली आहे. १६ ऑगस्टपासून ही भरतीप्रक्रिया सुरु होणार आहे. या नोकरीसाठी १०वी १२वी पास उमेदवार अर्ज करु शकतात.

Siddhi Hande

१० वी १२वी उत्तीर्ण तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे.महाराष्ट्र होमगार्डमध्ये एकूण ९ हजार ७०० पदांसाठी भरती राबवण्यात येणार आहे.होमगार्डमध्ये भरती होण्यासाठी काय पात्रता आहे?,कशाप्रकारे होणार भरती? असे प्रश्न उमेदवारांना पडलेले असतात.याबाबत संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

होमगार्ड पदासाठी राज्यातील अनेक जिल्ह्यांमधून अर्ज मागवण्यात आले आहे. ३४ जिल्ह्यात ही भरती होणार आहे. ही भरतीप्रक्रिया १६ ऑगस्टनंतर सुरु होणार आहे. या नोकरीसाठी २० ते ५० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार आहे. लेखी परीक्षा, फिजिकल स्क्रिनिंग टेस्ट आणि फिजिकल टेस्ट या परीक्षा द्याव्या लागणार आहे. यामध्ये निवड झाल्यानंतर कागदपत्रे पडताळणी केली जाणार आहे. यानंतर उमेदवारांची वैद्यकीय चाचणी घेण्यात येणार आहे. वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर पात्र उमेदवारांची नोकरीसाठी निवड करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रात जवळपास ६ वर्षानंतर होमगार्ड भरती करण्यात येणार आहे.या नोकरीसाठी ९,७०० पदे भरती केली जाणार आहे. याआधी २०१८-१९ मध्ये होमगार्ड भरती करण्यात आली होती. अनेक राज्यांमध्ये होमगार्ड भरती होत असते. महाराष्ट्रात अनेक वर्षानंतर ही भरती होणार आहे. त्यामुळे होमगार्डमध्ये भरती होण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ravi Jadhav : दिवाळीच्या मुहूर्तावर रवी जाधव यांनी दिलं मोठं सरप्राइज; नवीन चित्रपटाची घोषणा, रिलीज डेट काय?

Maharashtra Live News Update : उल्हासनगरमध्ये ऑफिस खुर्ची बनवणाऱ्या कारखान्याला मध्यरात्री भीषण आग

Thane Fire : ठाण्यात दिवाळीच्या पहिल्याच दिवशी 3 ठिकाणी आग, हिरानंदानी इस्टेटमध्ये ३१ मजल्यावर आगीचा भडका

BMC elections : मी मोदींचा भक्त, मुंबईवर भाजपचं कमळ फुलणारच, महेश कोठारे काय म्हणाले?

Fact Check : पंतप्रधान मोदी देणार 5 हजारांचं गिफ्ट? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय? VIDEO

SCROLL FOR NEXT