Homeguard Bharti Saam Tv
naukri-job-news

Homeguard Bharti: ६ वर्षांनी होमगार्ड भरती पुन्हा होणार;९७०० पदांसाठी नोकरीची संधी; या तारखेपासून सुरु होणार अर्ज प्रक्रिया

Homeguard Bharti 2024: महाराष्ट्रात होमगार्ड भरती सुरु होणार आहे. होमगार्डमध्ये तब्बल ९७०० जागांसाठी भरती आहे. या नोकरीसाठी १० वी आणि १२ वी पास उमेदवार अर्ज करु शकतात.

Siddhi Hande

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. १० वी आणि १२वी उत्तीर्ण तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. होमगार्डमध्ये मोठी भरती सुरू आहे. होमगार्ड आस्थपनेवरील एकूण ९ हजार ७०० जागांसाठी भरती राबवण्यात येणार आहे.

होमगार्ड पदासाठी राज्यातील उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. ३४ जिल्ह्यात ही भरती होणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकराच लवकर अर्ज करावे. ही भरती प्रक्रिया स्वातंत्र्य दिनानंतर म्हणजेच १६ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. या नोकरीसाठी २० ते ५० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकणार आहे. विशेष म्हणजे, जवळपास ६ वर्षांपूर्वी ही भरती करण्यात आली होती. १०१८-१९ या वर्षात होमगार्ड पदासाठी भरती करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा ही भरती करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील या होमगार्ड भरतीसाठी उमेदवारांना लेखी परीक्षा, फिजिकल स्क्रिनिंग टेस्ट, फिजिकल क्षमता टेस्ट या परीक्षा द्याव्या लागणार आहे. यानंतर पात्र उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी केली जाणार आहे. त्यानंतर वैद्यकीय चाचणी केली जाईल. वैद्यकीय चाचणीनंतर उमेदवारांची नोकरीसाठी निवड केली जाणार आहे.

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी अजून अनेक ठिकाणी भरती सुरु आहे. बँकेत नोकरीची सुवर्णसंधी आहे. आयबीपीएस परीक्षेद्वारे तुम्ही बँकेत भरती होऊ शकतात. याचसोबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये ग्रेड बी ऑफिसरसाठी भरती सुरु आहे. त्या नोकरीसाठीही तुम्ही अर्ज करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: लिफ्टमध्ये अडकली होती २ मुलं, धाडस दाखवत मुलीने वाचवले प्राण, व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण

Maharashtra Live News Update: अजित पवार यांच्या विमान अपघाताविषयी मोठी अपडेट

Upit Recipe: संध्याकाळी भूक लागल्यावर झटपट बनवा टेस्टी आणि हेल्दी उपीट, वाचा सोपी रेसिपी

How to Keep Kobi Fresh: कोबी आठवडाभर राहील ताजी, वापरा फक्त ही १ ट्रीक

Chennai Beach Accident : चेन्नईच्या बीचवर महाराष्ट्रातील ३ जण वाहून गेले, एका मुलीचा मृत्यू, एकजण बेपत्ता, सुदैवानं एक बचावला

SCROLL FOR NEXT