Maha Metro Recruitment Saam Tv
naukri-job-news

Maha Metro Recruitment: खुशखबर! महा मेट्रोमध्ये नोकरीची संधी; पगार मिळणार २,८०,००० रुपये; अर्ज कसा करावा?

Maha Metro Recruitment 2025: महा मेट्रोमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. चीफ मॅनेजर, डेप्युटी मॅनेदप पदासाठी ही भरती करण्यात येणार आहे.

Siddhi Hande

महा मेट्रोमध्ये नोकरीची संधी

तांत्रिक आणि वरिष्ठ पदांसाठी भरती

मिळणार ४०,००० ते २,८०,००० रुपये पगार

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. महा मेट्रोमध्ये नागपूर, पुणे, ठाणे, नवी मुंबई येथे भरती केली जाणार आहे. या ठिकाणी विविध प्रकल्पांसाठी वरिष्ठ आणि तांत्रिक पदांसाठी भरती केली जाणार आहे. महामेट्रोमध्ये काम करण्याची संधी तुमच्याकडे आहे. (Maha Metro Recruitment)

महा मेट्रोमधील नोकरी

या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १० ऑक्टोबर २०२५ आहे. ही भरती पाच वर्षांच्या करारावर होणार आहे. चांगल्या पदावर काम करण्याची ही उत्तम संधी आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर तुम्हाला ४०,००० ते २,८०,००० रुपये पगार मिळणार आहे.

महा मेट्रोमधील या भरती मोहिमेत चीफ प्रोजेक्ट मॅनेजर (सिग्नलिंग), डेप्युटी जनरल मॅनेजर (लँड मॉनिटायझेशन, सेफ्टी आणि ट्रेनिंग), सेक्शन इंजिनियर (इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल, टेलिकम्युनिकेशन) या पदांसाठी भरती केली जाणार आहेत.

या भरती मोहिमेत पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. चीफ प्रोजेक्ट मॅनेजर (सिग्नलिंग) पदासाठी उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक्स किंवा टेलिकम्युनिकेशन शाखेतून बी.ई किंवा बी.टेक पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी १९ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. डेप्युटी मॅनेजर पदासाठी ७ वर्षांचा अनुभव असावा.

या नोकरीसाठी तुम्हाला अर्ज जनरल मॅनेजर (एचआर), महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, मेट्रो भवन, दीक्षाभूमीजवळ, नागपूर ४४००१० येथे पाठवायचा आहे. १० ऑक्टोबरपूर्वी तुम्ही अर्ज पाठवावेत. या नोकरीबाबत सविस्तर माहिती www.mahametro.org या वेबसाइटवर देण्यात आली आहे. त्यानुसार तुम्ही पात्रतेनुसार अर्ज करावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Land Scam: १८०० कोटींच्या जमीन घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई, ३ जणांविरोधात गुन्हा

Shocking News : धक्कदायक! वर्क लोड आला म्हणून नर्सने केली १० रुग्णांची हत्या, नेमकं काय प्रकरण?

Farsan Bhaji Recipe: रोज रोज बटाट्याची भाजी खाऊन कंटाळलात? मग झणझणीत फरसाणची रस्सा भाजी खाऊन पाहाच

Pune Land Scam: मोठी बातमी! पुण्यात आणखी एक जमीन घोटाळा, तहसीलदारांसह ९ जणांविरोधात गुन्हा

Maharashtra Live News Update: खगोलशास्त्रातील आणखी एक तारा हरपला

SCROLL FOR NEXT