LIC Saam Tv
naukri-job-news

LIC Recruitment: खुशखबर! LIC मध्ये नोकरीची संधी; १९२ पदांसाठी भरती;अर्ज कुठे अन् कसा करावा?

LIC Recruitment 2025: एलआयसीमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. एलआयसीमध्ये अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. एलआयसीमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. ग्रॅज्युएशन पूर्ण झाले तर ही तुमच्यासाठी उत्तम संधी आहे. भारतीय जीवन विमा निगममध्ये हाउसिंग फायनान्समध्ये नोकरीची ही सुवर्णसंधी आहे.

एलआयसीमध्ये १९२ अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया कालपासून म्हणजेच २ सप्टेंबरपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ सप्टेंबर २०२५ आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

पात्रता

या भरती मोहिमेत अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा स्ट्रीममधून ग्रॅज्युएशन केलेले असावे. याचसोबत अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी याआधी अप्रेंटिसशिप केलेली नसावी. २० ते २५ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ९४४ रुपये शुल्क भरायचे आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ४७२ रुपये शुल्क भरायचे आहे.या नोकरीसाठी अर्ज करताना शुल्कदेखील ऑनलाइन भरायचे आहे.

अर्जप्रक्रिया

या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला NATS पोर्टल nats.education.gov.in.in वर जाऊन रजिस्टर करायचे आहे. त्यानंतर दिलेल्या पोर्टलवरुन अर्जप्रक्रिया पूर्ण करायचे आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला ट्रेनिंगसाठी जिल्हा प्रेफरन्स ही माहिती भरायची आहे. या नोकरीसाठी अर्ज कसा करायचा याबाबत सर्व माहिती दिली आहे.

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड प्रवेश परीक्षेद्वारे होणार आहे. ही परीक्षा १ ऑक्टोबर २०२५ रोजी होणार आहे.या नोकरीसाठी तुम्हाला कागदपत्रे पडताळणी केली जाणार आहे. यानंतर मुलाखत होणार आहे. या नोकरीसाठी भरती ८ ते १४ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'याच्यामुळे माझ्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला', शिंदेसेनेच्या नेत्याचा बॅनर फाडत मुलीचा गंभीर आरोप; पाहा VIDEO

Maharashtra Live News Update : माजी खासदार संजय काका पाटील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी वेगळ्या भूमिकेत

Thursday Horoscope: स्वतःवर गर्व वाटेल अशा गोष्टी घडतील; या ५ राशींसाठी आजचा दिवस खास

Hair Care: ६ आठवड्यात थांबेल कायमचे केस गळणे, करा हा साधा घरगुती उपाय; केस होतील घनदाट आणि शायनी

Maharashtra Politics : अजित पवारांना मोठा धक्का; अहिल्यानगरमधील शिलेदार कार्यकर्त्यांसह ओवेसींना साथ देणार

SCROLL FOR NEXT