Kokan Railway Job Saam Tv
naukri-job-news

Kokan Railway Job: कोकण रेल्वेत नोकरीची संधी; महिना ६८००० रुपये पगार; पात्रता जाणून घ्या

Kokan Railway Recruitment: रेल्वेत नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. तुम्हालाही रेल्वेत नोकरी करायची असेल तर सध्या कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे.

Siddhi Hande

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. बेलापूर सीबीडी येथे ३३ पदांसाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीबाबत सर्व माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे केली जाणार आहे.

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये मेकॅनिकल/प्रोजेक्ट्स डिपार्टमेंट मडगाव/वर्णा येथे नेमणूक करण्यात येणार आहे. ही भरती १ वर्षाच्या कंत्राटी पद्धतीने करण्यात येणार आहे. मात्र, हा करार वाढवला जाऊ शकते. (Kokan Railway Recruitment)

ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट पदासाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी सामान्य प्रवर्गासाठी ६ रिक्त आहेत. या नोकरीसाठी पे मॅट्रिक्स लेव्हल ६ नुसार ३५,४०० ते ६८,००० रुपये पगार मिळणार आहे.

या नोकरीसाठी इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स /मेकॅनिकल इंजिनियरिंग पदवी / पदविका प्राप्त उमेदवार अर्ज करु शकतात.मॅन्युफॅक्चरिंग/Maintainance And Equipment/Project Planning And Execution मध्ये कामाचा अनुभव असणे गरजेचे आहे. उमेदवाराकडे किमान १ वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे.

या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना रेल्वेच्या सुरु असलेल्या गाड्यांची देखभार आणि कोकण रेल्वेच्या विविध प्रोजेक्टचे सुरपविजन करणे हे काम असणार आहे. या नोकरीसाठी वॉक इन इंटरव्ह्यू ३ ऑक्टोबर २०२४ आहे. (Kokan Railway Jobs)

टेक्निशियन (मेकॅनिकल) पदासाठी २३ रिक्त पदे भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी मेकॅनिकल ट्रेड, फिटर, वेल्डर, मशिनिस्ट या ट्रेडमधील आयटीआय सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे. या नोकरीसाठी वेतन २५,५०० ते ५०,००० रुपये मिळणार आहे. या पदासाठी वॉक इन इंटरव्ह्यू ८ ऑक्टोबर २०२४ रोजी होणार आहे. तुम्ही www.kokanrailway.com वर याबाबत दिलेल्या जाहिरातीत वॉक इन इंटरव्ह्यूचा पत्ता देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : जय गुजरात; एकनाथ शिंदेंची पुण्यात अमित शहांसमोरच घोषणा

Govindwadi Bypass Bridge : ६ वर्षांतच पुलाची दैना; कल्याणच्या गोविंदवाडी बायपास पुलाच्या कोट्यवधींच्या कामावर प्रश्नचिन्ह

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस गळण्याची समस्या? 'या' टिप्सने घ्या केसांची योग्य काळजी

मराठमोळ्या ठसक्यात तरुणीचा जोरदार डान्स; 'चाळ माझ्या पायांत' गाण्यावर दिला धमाकेदार परफॉर्मन्स

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

SCROLL FOR NEXT