Recruitment 2024 Saam Tv
naukri-job-news

Recruitment 2024 : पदवीधर उमेदवारासाठी सरकारी नोकरीची सुवर्ण संधी; अर्जाकरित अंतिम मुदत जाणून घ्या

JSSC Stenographer Recruitment 2024 : आपल्यापैंकी प्रत्येकाला सरकारी नोकरी प्राप्त करण्याची इच्छा असते.जर तुम्हाला सरकारी नोकरी करण्याची इच्छा असल्यास ही बातमी तुमच्यासाठी.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पदवी पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आज आम्ही काही सरकारी नोकरीची संधीची माहिती घेऊन आलो आहोत.झारखंड राज्यात स्टाफ सिलेक्शन कमिशनने स्टेनोग्राफरच्या साधारण ४५५ एवढ्या पदांसाठी भरती प्रक्रियेची अधिसूचना जारी केली आहे. ही भरती प्रकियेसंबंधित अर्ज प्रक्रिया अद्याप सुरु करण्यात आलेली नसून ती ६ सप्टेंबर २०२४ रोजी सुरु करण्यात येणार आहे. ज्या इच्छुक उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा असल्यास त्यांनी अर्ज प्रक्रिया सुरु झाल्यानंतर अर्ज भरावा.

कोणत्या वेबसाइटवरुन अर्ज करावा?

JSSC स्टेनोग्राफरच्या असलेल्या पदांसाठी उमेदवार फक्त ऑनलाइन अर्ज करु शकतात. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना झारखंड कर्मचारी निवड आयोगाच्या असलेल्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.जी वेबसाइट आहे-''jssc.nic.in'तसेचJSSCमध्ये साधारण ४५५ स्टेनोग्राफर या पदांसाठी पात्र उमेदवारांची भरती करेल.या पदांसाठी अर्ज ६ सप्टेंबरपासून सुरु होतील शिवाय अर्ज(application) भरण्याची अंतिम तारीख ५ ऑक्टोबर २०२४ असेल.

पात्रता?

या भरती प्रक्रियेसाठीई अर्ज करण्यासाठी उमेदवारांना मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी (degree)पूर्ण केलेली असावी. महत्त्वाचे म्हणजे उमेदवारांची वयोमर्यादा २१ ते ३५ असणे आवश्यक आहे. शिवाय या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करताना १०० रुपयापर्यंत शुल्क भरावे लागेल. १०० रुपये फी जनरल आणि ओबीसी शिवाय ईडब्ल्यूएस श्रेणीतील उमेदवारांसाठी आहे. तसेच एसी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज फी म्हणून फक्त ५० रुपये इतके शुल्क भरावे लागतील.

निवड प्रक्रिया कशी होईल?

या भरती प्रक्रियेत सर्वात प्रथम लेखी परीक्षा आणि त्यानंतर कौशल्य चाचणा आणि सर्वात शेवची कागदपत्र पडताळी अशा टप्प्यातून ही प्रक्रिया पार पडेल. मात्र परीक्षेती तारीख अजून जाहीर करण्यात आलेली नाही. जर तुम्हाला या पदांसाठी परिक्षा तसेच अर्ज भरायचा असल्यास तुम्हाला वेळोवेळी या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. या पदांसाठी उमेदवारांची निवड झाल्यानंतर उमेदवारांना साधारण २५,५०० रुपये ते ८१,१०० रुपये इतका प्रति महिना पगार(salary) असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actress Father shot: 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर झाडल्या गोळ्या; २ तरुणांनी केला हत्येचा प्रयत्न

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचा आशीर्वाद मलाच मिळाला; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

Amarnath Yatra Bus Accident : अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांचा भीषण अपघात; 5 बस एकमेकांना आदळल्या, परिसरात खळबळ

Ashadhi Ekadashi: आषाढी एकादशीच्या उपवासात चुकूनही खाऊ नका हे ५ पदार्थ

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा वापर केला; ते युज अँड थ्रो करणारे, मेळाव्यानंतर भाजप नेत्याची जळजळीत टीका

SCROLL FOR NEXT