Resume आणि Cover Letter हे दोन्ही कागदपत्रे नोकरीचा अर्ज करण्यासाठी आवश्यक असतात. Resume तुमचा व्यावसायिक इतिहास कामाचा अनुभव दाखवतात. तर कव्हर लेटर तुमची विचार करण्याची पद्धत आणि संवाद करण्याचं कौशल्य दाखवत असतं. जर तुम्ही MNC कंपन्यांमध्ये काम करण्याचे स्वप्न पाहत असाल, तर दोन्ही कागदपत्रे योग्य पद्धतीने बनवणं आवश्यक असतं. या दोन्ही कागदपत्रांवरून तुम्हाला नोकरी मिळत असते.
आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पदवी किंवा अनुभवाने नोकरी मिळत नाही. तुमच्याकडे कोणती कौशल्य आहेत, त्याची माहिती झाल्यानंतर कंपनीने तुम्हाला नोकरीची ऑफर लवकर देत असते. कंपन्या आता अशा उमेदवाराच्या शोधात असतात जो केवळ पात्र नाही तर स्वतःला कसे सादर करतात. MNC कंपन्या उमेदवाराच्या व्यक्तिरेखेचे प्रत्येक पैलूतून मूल्यांकन करत असतात. मग ते तांत्रिक कौशल्य असो, संवाद कौशल्य असो किंवा प्रोफेशनल वागणूक असो.
त्यामुळे नोकरीसाठी अर्ज करताना Resumeआणि Cover Letter दोन्ही कागदपत्रे खूप महत्त्वाची असतात. परंतु बरेच उमेदवार या दोन्ही कागदपत्रांना एकच कागदपत्र मानण्याचं चूक करत असतात. नोकरीसाठी 'रिझ्युमे' च आवश्यक असल्याचं म्हणतात, पण अनेकदा 'कव्हर लेटर'कडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे अनेकांना नव्या संधी मिळत नाही.
Google, Microsoft, Accenture, Deloitte,आणि TCS अशा कंपन्या फक्त स्किल पाहत नाहीत तर तुम्ही स्वतःला किती हुशारीने आणि व्यावसायिकपणे सादर करता हे देखील पाहत असतात. Resume हे तुम्हाला कामाचा अनुभव किती वर्षांचा आहे, याची माहिती देत असते. तर कव्हर लेटरमधून तुम्ही त्या नोकरीसाठी किती आणि से योग्य उमेदवार आहात, याची माहिती देत असते.
Resume हे एक कागदपत्र असते ज्यात उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, कामाचा अनुभव, कौशल्य, कामगिरी, केलेल्या कामांची थोडक्यात माहिती देण्यात येते. याचा उद्देश हे सहसा १ ते २ पानांचे असते आणि त्याचा मुख्य उद्देश नोकरी देणाऱ्या मॅनेजरला तुम्ही त्या नोकरीसाठी किती पात्र आहात हे दाखवणे असते.
डेटा-केंद्रित असावं. (Dates, Achievements, Percentages)
स्ट्रक्चर फिक्स असतं ( Education – Experience – Skills)
सर्व माहिती पॉईंट्समध्ये दिलेली असावी.
प्रत्येक नोकरीनुसार बनवलं जातं.
कव्हर लेटर हे एक वैयक्तिकृत कागदपत्र असत, जे रिज्युमसोबत पाठवले जात असते. यामध्ये तुम्ही कंपनीला संबोधित करता आणि त्या पदासाठी तुम्ही अर्ज का केला आहे, तुमची पार्श्वभूमी त्या भूमिकेशी कशी जुळते आहे, हे सांगत असते. तसेच तुम्हाला संबंधित कंपनीत का काम करायचे आहे हे सांगत असते. याला एक प्रकारचे प्रोफेशनल Introduction प्लस पिच लेटर असेही म्हणता येईल.
हे फॉर्मल और कस्टमाइज्ड असते.
यातून आपल्याला संबंधित नोकरी करण्याची इच्छा असल्याचं सांगायचे असते .
Resume ला पाठिंबा देणारं असतं, परंतु Resumeमधील गोष्टी यात परत सांगून नये.
यातून तुम्ही संवाद कसा करता हे दिसत असतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.