Bank Jobs Saam TV
naukri-job-news

Janata Sahkari Bank Recruitment: जनता सहकारी बँकेत लिपिक पदांसाठी भरती; मिळणार ३० हजार रुपये पगार; अर्ज कुठे आणि कसा करावा? जाणून घ्या

Janata Sahkari Bank Job Vacancy [July 2024]: जनता सहकारी बँकेत लिपिक पदांसाठी भरती सुरु आहे. पदवीधर उमेदवार या पदांसाठी अर्ज करु शकतात. या पदांसाठी तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात.

Siddhi Hande

जनता सहकारी बँकेत लिपिक पदासाठी भरती सुरु आहे. बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. पदवीधर उमेदवारांसाठी ही नोकरीची सुवर्णसंधी आहे. याबाबत जाहिरात चेअरमन, जनता सहकारी बँक लिमिटेडद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.

बँक खात्यात नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे. पदवीधर उत्तीर्ण उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. B.com, M.com उत्तीर्ण उमेदवार अर्ज करु शकतात. २५ ते ३५ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. ऑफलाइन आणि ऑनलाइन पद्धतीने या नोकरीसाठी अर्ज मागवण्यात आले आहे. सोलापूरमधील शाखेसाठी ही नोकरीची संधी आहे.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना संगणकाचे ज्ञान असणे गरजेचे आहे.४ जुलै ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तुम्ही janatabank.ho.it@gmail.com या ईमेल आयडीवर तुमचा बायोडाटा पाठवू शकतात.

बँकेत नोकरीच्या अनेक संधी आहेत. सध्या पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी आहे. आयबीपीएद्वारेदेखील सरकारी बँकेमध्ये लिपिक पदांसाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. याबाबत सर्व माहिती आयबीपीएसच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Social Media Platform: इन्स्टाग्राम की युट्यूब? कोणत्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर होते अधिकची कमाई, वाचून व्हाल थक्क

India Alliance Protest: राहुल गांधी, संजय राऊतांना पोलिसांनी घेतलं ताब्यात; इंडिया आघाडीचा मोर्चा रोखला| VIDEO

Navi Mumbai-Mumbra : दीड तासाचा प्रवास फक्त १५ मिनिटांत, मुंब्रा ते नवी मुंबईला प्रवास सुसाट होणार, वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: प्रियंका गांधी, राहुल गांधी यांच्यासह इंडिया आघाडीच्या खासदारांना ताब्यात घेतलं

अश्लील व्हिडिओ काढून ब्लॅकमेल, ५ नराधमांकडून अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; मुंबईत चाललंय काय?

SCROLL FOR NEXT