High Court Job Saam Tv
naukri-job-news

High Court Job: उच्च न्यायालयात नोकरीची संधी; विविध पदांसाठी भरती सुरु; अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

Siddhi Hande

उच्च न्यायालयात नोकरीची सुवर्णसंधी आहे. सरकारी नोकरीच्या शोधत असणाऱ्या तरुणांसाठी ही चांगली बातमी आहे. जम्मू आणि काश्मीर, लडाख उच्च न्यायालय, श्रीनगर येथील उच्च न्यायालयात ही भरती होणार आहे. याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

उच्च न्यायलयातील या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. तुम्ही jkhighcourt.nic.in वर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. (High Court Job)

उच्च न्यायालयातील या भरती मोहिमेत २६३ पदे भरण्यात येणार आहे. त्यात २०७ पदे ही ज्युनिअर असिस्टंट पदासाठी आहेत. स्टेनोग्राफर पदासाठी ७१ पदे रिक्त आहेत. सिस्टीम ऑफिसर पदासाठी १ पदे तर सिस्टीम असिस्टंट पदासाठी ४ पदे रिक्त आहेत. या पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.

या नोकरीसाठी १८ ते ४० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी ५०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. या नोकरीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. याची लिंक हाय कोर्टाच्याच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. (High Court Recruitment)

या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १ ऑक्टोबर २०२४ आहे. त्याआधी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत.तुम्ही जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या, त्यानंतर नोंदणी करुन अर्ज भरा. (Government News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

Employees Provident Fund: PF खातेधारकांसाठी मोठी बातमी; पीएफमधून काढता येणार १ लाख रुपये

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT