Government Job: दूरसंचावर मंत्रालयात नोकरीची संधी; महिन्याला ९०००० पगार; पात्रता आणि अटी जाणून घ्या

Ministry Of Communication Recruitment: देशाच्या दूरसंचावर मंत्रालयात काम करण्याची सुवर्णसंधी आहे. दूरसंचार विभागात विविध पदांसाठी भरती सुरु आहे.
Government Job
Government JobSaam Tv
Published On

सध्या अनेकजण सरकारी नोकरीच्या शोधात आहे. सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. देशाच्या दूरसंचार मंत्रालयात म्हणजे Ministry Of Communication विभागात नोकरीची उत्तम संधी आहे. दूरसंचार मंत्रालयात ज्युनिअर अकाउंटंट, लोवर डिव्हिजन क्लर्क, पर्सनल सेक्रेटरी, स्टेनोग्राफर आणि मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी भरती जाहीर केली आहे.

दूरसंचार मंत्रालयाने या नोकरीबाबत अधिसूचना जाहीर केली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. २१ ऑक्टोबर २०२४ ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना तीन वर्षांच्या कालावधीसाठी काम करायचे आहे. (Government Job)

Government Job
Supreme Court Job: सुप्रीम कोर्टात नोकरीची संधी; १०वी पास तरुणांनो आजच करा अर्ज, जाणून घ्या सविस्तर

कोणत्या पदांसाठी भरती आहे?

ज्युनिअर अकाउंटंट पदासाठी ९ पदे रिक्त आहेत.क्लर्क पदासाठी १५ पदे आहेत. पर्सनल सेक्रेटरी पदासाठी १ जागा रिक्त आहे. स्टेनोग्राफर पदासाठी १ जागा रिक्त आहे तर मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी १ जागा रिक्त आहे. एकूण २७ जागांवर ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या पदानुसार वेतन देण्यात येणार आहे. वेतन स्तर ७ नुसार हे वेतन दिले जाईल.

ज्युनिअर अकाउंटंट पदासाठी २९००० ते ९२००० रुपये पगार मिळणार आहे. लोवर डिव्हिजन क्लर्क पदासाठी १९९०० ते ६३००० रुपये पगार मिळेल. पर्सनल सेक्रेटरी पदासाठी ४४,९०० ते १,४२,४०० रुपये पगार देण्यात येईल. स्टेनोग्राफर पदासाठी २५००० ते ८१,००० रुपये पगार मिळणार आहे. मल्टीक टास्किंग स्टाफ पदासाठी ५६९०० रुपयांपर्यंत पगार देण्यात येणार आहे. (Ministry Of Communication Recruitment)

Government Job
Mazagaon Dock Job: माझगाव डॉकमध्ये नोकरी करा, महिन्याला ८३००० कमवा; कोणत्या पदासाठी भरती, पात्रता काय? जाणून घ्या सविस्तर

पात्रता

ज्युनिअर अकाउंटंट पदासाठी ५ वर्षांचा कामाचा अनुभव असायला हवा किंवा केंद्र आणि राज्य सरकारी विभागात ३ वर्ष काम केलेले असावे. लोवर डिविजन क्लर्क पदासाठी केंद्र आणि राज्य सरकार विभागात अधिकारी म्हणून काम केलेले असावे. पर्सनल सेक्रेटरी आणि स्टेनोग्राफर पदासाठी PSU मध्ये काम केलेले उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी कमाल वयोमर्यादा ५६ वर्ष निश्चित करण्यात आली आहे. (Ministry Of Communication Job)

Government Job
Railway Jobs : लोको पायलट ते स्टेशन मास्तर, कोकण रेल्वेत नोकरीची संधी;५०,००० रुपये मिळणार पगार, आजपासून प्रोसेस सुरू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com