ITBP Recruitment Saam Tv
naukri-job-news

ITBP Recruitment: ITBP मध्ये मेगाभरती; हेड कॉन्स्टेबल पदासाठी नोकरीची संधी;अर्ज करण्याची शेवटची तारीख जाणून घ्या

ITBP Recruitment 2024: इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्समध्ये भरती सुरु आहे. ज्या उमेदवारांना देशाची सेवा करायची आहे त्यांना या नोकरीसाठी अर्ज करण्याची सुवर्णसंधी आहे. या नोकरीसाठी अर्ज कसा करावा याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

Siddhi Hande

देशसेवा करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर आहे. इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्समध्ये भरती सुरु आहे. याबाबत आयटीबीपीने अधिसूचना जाहीर केली आहे. यात या संस्थेने हेड कॉन्स्टेबल (शिक्षण आणि तणाव सल्लागार) या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात आणि अर्ज करु शकतात.

या नोकरीसाठी एकूण ११२ पदे भरण्यात येणार आहे. यात हेड कॉन्स्टेबल ही पदे भरण्यात येणार आहे.यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा बॅचर ऑफ एज्युकेशन किंवा टिचिंग यामध्ये पदवी मिळवलेली असणे आवश्यक आहे.

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, शारीरिक कार्यक्षमता आणि शारीरिक मानक परिक्षण या चाचणीच्या आधारे घेतली जाईल. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला १०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर अनुसुचित जाती, जमातीसाठी अर्जाच्या शुल्कात सूट देण्यात आली आहे.

अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ITBP recruitment.itbppolice.nic.in वर जाऊन अर्ज भरावा लागेल. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ ऑगस्ट २०२४ आहे. ज्या लोकांना देशसेवा करायची इच्छा आहे. त्यांनी या नोकरीसाठी अर्ज करावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Government: आता विधवांना संबोधलं जाईल 'एकल महिला', महाराष्ट्र सरकारची नवी योजना

EPFO शटडाऊन! ३ दिवस बंद राहणार PF पोर्टल, 'ही' कामं करताना येणार अडचणी; ५ पर्याय कोणते?

Maharashtra News Live Update: शिवसेना शिष्टमंडळाची महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

SCROLL FOR NEXT