ISRO Jobs Saam Tv
naukri-job-news

ISRO Jobs: इस्त्रोमध्ये नोकरीची संधी; महिना २ लाख पगार; पात्रता आणि अर्जप्रक्रिया जाणून घ्या

ISRO Job Recruitment: तरुणांना इस्त्रोमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. इस्त्रोमध्ये १०३ विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये मेडिकल ऑफिसर ते ड्राफ्ट्समन पदासाठी भरती केली जाणार आहे.

Siddhi Hande

इस्त्रोमध्ये काम करण्याचे अनेक तरुणांचे स्वप्न असते. इस्त्रो ही भारतीय अंतराळ संस्था आहे. अंतराळातील सर्व माहिती इस्त्रोद्वारे मिळवली जाते. इस्त्रोमध्ये सध्या नोकरीची सुवर्णसंधी आहे.

इस्त्रोमध्ये मेडिकल ऑफिसर, शास्त्रज्ञ, इंजिनियर, टेक्निकल असिस्टंट आणि ड्राफ्ट्समॅन पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात.isro.gov.in या वेबसाइटवर जाऊन तुम्ही अर्ज करु शकतात. (ISRO Job)

इस्त्रोमधील या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ ऑक्टोबर २०२४ आहे.मेडिकल ऑफिसर पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून एम.बी. बी.एस. पदवी प्राप्त केलेली असावी. तसेच एविएशन मेडिसिनमध्ये एम.डी पदवी प्राप्त केलेली असावी.स्पोर्ट्स मेडिसिन पदासाठीदेखील मान्यताप्राप्त विद्यापीठातून एम.बी.बी.एम आणि एविएशन मेडिसिनमध्ये एम.डी पदवी प्राप्त केलेली असावी.स्ट्रकचरल डिझाइन या पदासाठी उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.ई किंवा बी. टेक पदवी प्राप्त केलेली असावी. त्याचसोबत सिव्हिल इंजिनियरिंग आणि एम.ई, एम.टेक पदवी प्राप्त असावी. (ISRO Recruitment)

इस्त्रोमधील नोकरीसाठी वयोमर्यादा पात्रतेनुसार बदलण्यात आली आगे. १८ ते ३५ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

या नोकरीसाठी उमेदवारांना २१,७०० ते २,०८,७०० रुपये पगार मिळणार आहे. पदानुसार पगार निश्चित करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन माहिती मिळवावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

घरगुती गॅस पुरवठ्याबाबत हायकोर्टानं दिला महत्वाचा आदेश, केंद्र सरकारलाही धाडली नोटीस

रायगडच्या राजकारणात अनपेक्षित घडामोडी, जिल्हा परिषद वादावर कसा पडला पडदा?

Esakal No.1: ई-सकाळचा डिजिटल डंका; कॉमस्कोरमध्ये अव्वल स्थान पटकावलं

Masala Kairi Recipe: जिभेचे चोचले पुरवणारी चटपटीत मसाला कैरी घरी कशी बनवायची?

LPG Cylinder VS Induction: LPG की इंडक्शन? कशावर जेवण बनवणे जास्त स्वस्त

SCROLL FOR NEXT