Bank Jobs Saam Tv
naukri-job-news

Bank Jobs: इंडियन ओवरसीज बँकेत नोकरीची संधी, ७५० पदांसाठी भरती; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Indian Overseas Bank Recruitment 2025: इंडियन ओवरसीज बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. अप्रेंटिस पदासाठी ही भरती जाहीर केली आहे.

Siddhi Hande

बँकेत नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. बँकेत नोकरी करुन चांगल्या पगाराची नोकरी मिळवायची असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. इंडियन ओवरसीज बँकेत सध्या भरती सुरु आहे. बँकेत अप्रेंटिससह अनेक पदांसाठी अर्जप्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया कालपासून सुरु झाली आहे.

इंडियन ओवरसीज बँकेतील या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. तुम्ही iob.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे होणार आहे. ही परीक्षा २४ ऑगस्ट रोजी होणार आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करावेत.

इंडियन ओवरसीज बँकेतील ही भरती ७५० पदांसाठी होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑगस्ट २०२५ आहे. त्यामुळे उमेदवारांनी मुदतीपूर्वी अर्ज करावेत.

पात्रता (IOB Recruitment Eligibility)

इंडियन ओवरसीज बँकेतील या नोकरीसाठी इच्छुकांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून डिग्री प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी २० ते २८ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षा, स्थानिक भाषा टेस्ट आणि मुलाखतीद्वारे होणार आहे. तुम्हाला या परीक्षेसाठी लॅपटॉप, डेस्कटॉप आणि स्मार्टफोनचा वापर करावा लागणार आहे.

या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ९४४ रुपये फी भरायची आहे. महिला व एसटी प्रवर्गासाठी ७०८ रुपये फी तर दिव्यांग उमेदवारांना ४७२ रुपये फी भरायची आहे.

जर तुम्ही फ्रेशर्स असाल तुमचे नुकतेच शिक्षण पूर्ण झाले असेल तर नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे. तुम्हाला या नोकरीच्या माध्यमातून खूप काही शिकता येईल. अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर केली आहे. त्यामुळे ग्रॅज्युएशन पूर्ण झालेल्या तरुणांना लवकरात लवकर अर्ज करावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tejashri Pradhan: जान्हवीच्या ६ सासूबाईंनी तेजश्री प्रधानला दिल्या सूखी संसाराच्या टीप्स; सोबतच केली 'होणार सून मी...' गाण्यावर हुक स्टेप, VIDEO

Zing Marathi Movie : टाळ्या अन् शिट्ट्यांचा गजर; 'झिंग' चित्रपट येतोय, रिलीज डेट काय?

GK: कमी खर्च, चांगली सोय! भारतातील सर्वात स्वस्त परवडणारे शहर कोणते?

Maharashtra Live News Update: जगदीप धनखड यांचे कॅमेरामॅनही गायब- प्रियंका चतुर्वेदी

Agriculture News : ऊस, द्राक्षाच्या पट्ट्यात कडधान्याचा पेरा; सर्वाधिक २४०० एकरांवर उडीदाची पेरणी

SCROLL FOR NEXT