Indian Oil Job Saam Tv
naukri-job-news

Indian Oil Job: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार सरकारी नोकरी; इंडियन ऑइलमध्ये भरती सुरु; मिळणार १६०००० रुपये पगार

Indian Oil Recruitment 2024: सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या आनंदाची बातमी आहे. इंडियन ऑइलमध्ये सध्या लॉ ऑफिसर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

इंडियन ऑइलमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये ऑफिसर होण्याची चांगली संधी आहे.त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

ज्या उमेदवारांकडे ग्रॅज्युएट डिग्री किंवा लॉमध्ये ग्रॅज्युएट डिग्री आहे तेच उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. याचसोबत ५ वर्षांच्या LLB डिग्री असायला हवी. इंडियन ऑइलच्या या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ ऑक्टोबर २०२४ होती. ही तारीख आता वाढवून १८ ऑक्टोबर २०२४ करण्यात आली आहे. (Indian Oil Job)

लॉ ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ३० वर्ष असावी. या नोकरीसाठी १२ जागा रिक्त आहे.IOCL भरतीमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराला कमीत कमी २ वर्षांचा अनुभव असायला हवा. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड CLAT 2024 स्कोर, ग्रुप डिस्कशन, ग्रुप टास्क, मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. लॉ ऑफिसर पदासाठी उमेदवारांनी ५०,००० ते १,६०,००० रुपये पगार मिळणार आहे.

इंडियन ऑइलमध्ये या भरतीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात.या नोकरीबाबत सर्व माहिती अधिकृत वेबसाइटवर दिली आहे. तुम्ही आवश्यक कागदपत्रे सबमिट करुन फॉर्म भरु शकतात. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. (Indian Oil Recruitment)

सध्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमध्येही नोकरीची चांगली संधी आहे. टाटा इन्स्टिट्यूटमध्ये अनेक पदांसाठी भरती सुरु आहे. बी कॉम ते हॉटेल मॅनेजमेंट पदवी प्राप्त उमेदवार विविध पदांसाठी अर्ज करु शकतात. टिआरएफच्या अधिकृत वेबसाइवर याबाबत माहिती देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT