इंडियन ऑइलमध्ये नोकरीची संधी
३९४ पदांसाठी भरती जाहीर
पगार २५००० ते १,०५,००० रुपये
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. इंडियन ऑइलमध्ये ज्युनिअर इंजिनियर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २१ डिसेंबरपासून म्हणजे आजपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
इंडियन ऑइलमध्ये भरती (Indian Oil Recruitment)
इंडियन ऑइलमध्ये एकूण ३९४ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ जानेवारी २०२६ निश्चित करण्यात आली आहे.
इंडियन ऑइलमधील नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते २६ असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत ५ वर्षांची सूट आणि ओबीसी उमेदवारांना तीन वर्षांची सूट देण्यात आली आहे.
पगार
ज्युनिअर इंजिनियर पदासाठी निवड झाल्यावर उमेदवारांना महिन्याला २५००० ते १,०५,००० रुपये पगार मिळणार आहे. याचसोबत इतर अनेक सुविधादेखील मिळणार आहे.
इंडियन ऑइलमधील नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून केमिकल इंजिनियरिंग, केमिकल टेक्नोलॉजी, मेकॅनिकल इंजिनियरिंग, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंमध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा केलेला असावा.
असा करा अर्ज (How To Apply)
आयओसीएलमधील ज्युनिअर इंजिनियर पदासाठी अर्जप्रक्रिया आजपासून सुरु झाली आहे. यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे.
सर्वात आधी तुम्हाला www.iocl.com वर जावे.
यानंतर What’s New सेक्शनवर जावे.
यानंतर Click here to Apply Online वर क्लिक करा.
यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाकायचा आहे. रजिस्ट्रेशन पूर्ण करायचे आहे.
यानंतर तुम्हाला सर्व माहिती भरुन फॉर्म भरायचा आहे.
यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज सबमिट करा.
तुम्ही अर्ज सबमिट केल्यावर त्याची प्रिंट आउट काढून ठेवा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.