Indian Navy Recruitment Saam Tv
naukri-job-news

Indian Navy Recruitment: भारतीय नौदलात नोकरीची सुवर्णसंधी;SSC ऑफिसर पदासाठी सुरु आहे भरती;अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

Indian Navy Recruitment 2024: भारतीय नौदलात नोकरीची सुवर्णसंधी आहे. अधिकारी पदासाठी ही भरती करण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांनी या नोकरीसाठी लवकरात लवकर अर्ज करावेत.

Siddhi Hande

भारतीय नौदलात नोकरी करण्याचे अनेकांचे स्वप्न असतात. जर तुम्हालाही देशासेवेसाठी काम करण्याची इच्छा असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. भारतीय नौदलात शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. याबाबत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.

इंडियन नेवी एसएससी ऑफिसर भरतीसाठी अर्ज करण्याची सुरुवात १४ सप्टेंबर २०२४ पासून सुरु होणार आहे. २९ सप्टेंबर २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला joinindiannavy.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा.

भारतीय नौदलाच्या एक्झिक्युटीव्ह ब्रँचमध्ये जनरल सर्व्हिस, एअर ट्राफिक कंट्रोलर, नेवर एअर ऑपरेशंस ऑफिसर, पायलट एसएससी ऑफिसर किंवा लॉजिस्टिक्स SSC ऑफिसर पदांसाठी ही भरती होणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी निश्चित करण्यात आली आहे.

या नोकरीसाठी बीई/बीटेक/ मास्टर डिग्री इन इलेक्ट्रॉनिक्स-फिजिक्स/ एमएससी आयटी/ एमसीए पदवी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करणारा उमेदवार २ जुलै २०००-०१ ते १ जानेवारी २००६ या कालावधीत जन्मलेला असावा.

सध्या सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि स्टेट बँक ऑफ इंडियामध्येही नोकरीची सुवर्णसंधी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अधिकारी पदासाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी उमेदवारांना जवळपास ४५ लाखांचे पॅकेज मिळणार आहे. त्यामुळे नोकरीच्या शोधात असणारे तरुण या नोकरीसाठीदेखील अर्ज करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akot News : मुसळधार पावसाने पूरजन्य स्थिती; अमीनापूर गावचा संपर्क तुटला, शेकडो ग्रामस्थ अडकले

Ind Vs Eng Oval Test : इंग्लंडविरुद्ध पाचव्या कसोटीत टीम इंडियात होणार मोठे बदल, जसप्रीत बुमराह खेळणार?

पहलगाम हल्ल्याचा बदला घेतलाच! ३ दहशतवाद्यांना धाडलं यमसदनी, अमित शहांनी संसदेत काय-काय सांगितलं?

Maharashtra Live News Update : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसेची बैठक

Monsoon Sweating : पावसाळ्यात जास्त घाम का येतो? यावर उपाय काय?

SCROLL FOR NEXT