Indian Air Force Recruitment Saam Tv
naukri-job-news

Air Force Agniveer Recruitment: भारतीय वायुसेनेत अग्नीवीरवायू पदांसाठी भरती सुरू; 'इतका' मिळणार पगार; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Indian Air Force Recruitment 2024 For Agniveer Post: देशसेवा करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. भारतीय हवाी दलात अग्नीवीर या पदासाठी भरती सुरु करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

Siddhi Hande

अनेक तरुणांना आपल्या देशासाठी काहीतरी करायचे असते. याच तरुणांसाठी भारतीय हवाई दलात नोकरीची सुवर्णसंधी आहे. अग्निवीरवायूच्या नवीन एचआर पॉलिसीनुसार, नवीन तरुणांना वायुसेनेत भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहे. भरतीची जाहिरात हवाई दलाच्या अधिकृत वेबसाइटवर दिली आहे.

सरकारी विभागात देशसेवा आणि चांगली नोकरी मिळवण्यासाठी ही चांगली संधी आहे. केंद्र सरकारद्वारे ही भरती केली जाणार आहे. १२ वी उत्तीर्ण उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ३०,००० रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे.

या नोकरीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करणारा उमेदवार ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. बारावीत त्या उमेदवाराने गणित, फिजिक्स आणि इंग्लीश विषय घेतलेला असावा. किंवा इंजिनियरिंग डिप्लोमा केलेला असावा. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांची पोस्टिंग भारतात कुठेही करण्यात येईल. या नोकरीसाठी परीक्षा घेतली जाणार आहे. २८ जुलै २०२४ पर्यंत तुम्ही या नोकरीसाठी अर्ज करु शकणार आहेत.

जर तुम्हाला सरकारी नोकरी करायची असेल तर रेल्वेत सध्या भरती सुरु आहे. लोको पायलट आणि टीसी या पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता तुमचे सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. याचसोबत एसएससी आणि पोस्ट ऑफिसमध्येदेखील भरती सुरु आहे. या नोकरीसाठी लवकरात लवकर अर्ज करावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार...

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT