Post Office Bharti Saam Tv
naukri-job-news

Post Office Bharti: पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

India Post Bharti 2025: इंडिया पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. डाक विभागात पोस्टल प्रशिक्षणार्थी पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय डाक विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. डाक विभागाद्वारे भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. १०० पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

भारतीय डाक विभागात सहाय्यक पोस्टल प्रशिक्षणार्थी पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. १०० पदे भरली जाणार आहेत.या नोकरीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्जप्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या भरतीसाठी B/ASP/IP/LSG/PA/SA/OA/MTS/GDS अधिकारी किंवा कर्मचारी अर्ज करु शकतात.

या नोकरीसाठी CEPT सध्या बंगळुरु, म्हैसूर, चेन्नई, हैदराबाद, विशाखापट्टणम, कोची, मुंबई आणि पटना येथे कार्यरत आहेत. दरम्यान, या संबंधित कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना या नोकरीसाठी निवडण्यात येईल.

या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ सप्टेंबर २०२५ रोजी आहे.या नोकरीसाठी तुम्हाला indiapost.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी https://cept.gov.in/willingness/candidateform.aspx यावर जाऊन रजिस्ट्रेशन करायचे आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना ३० सप्टेंबरपूर्वी रिपोर्टिंग करायचे आहे.

पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे. त्यामुळे जर तुम्ही पोस्टात वर दिलेल्या इतर पदांवर कार्यरत असाल तर तुम्ही या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या नोकरीसाठीचे ठिकाण वेगवेगळ्या शहरतदेखील असू शकते. त्यामुळे तुम्ही अर्ज करण्यापूर्वी एकदा अधिसूचना पूर्ण वाचावी. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navapur : युरियाचा कृत्रिम तुटवडा; किंमतीपेक्षा अधिक दराने युरिया बॅगची विक्री, शेतकऱ्यांची होतेय अडवणूक

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार? मोठ्या पदावरील युवा नेता महायुतीच्या वाटेवर

Prithvi Shaw-Sapna Gill Case: पृथ्वी शॉला मुंबई कोर्टाचा दणका; विनयभंग प्रकरणात ठोठावला दंड

Angina Symptoms: भारतीय महिलांच्या हृदय आरोग्यासाठी आवश्यक माहिती अन् प्रभावी उपाय

Nepal Protest: नेपाळमधील अस्थिरतेचा भारतावर काय होणार परिणाम? अर्थव्यवस्था अन् देशाची सुरक्षेवर संकट

SCROLL FOR NEXT