Income Tax Bharti Saam Tv
naukri-job-news

Income Tax Recruitment: आयकर विभागात काम करण्याची संघी; पगार ११२४००; अर्ज कसा करावा?

Income Tax Recruitment 2025: इन्कम टॅक्स विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. स्टेनोग्राफर पदासाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. इन्कम टॅक्स विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. आयकर विभागात स्टेनोग्राफर ग्रेड १ पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. केरळ येथे ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. (Income Tax Recruitment )

आयकर विभागातील या भरतीसाठी तुम्ही incometaxindia.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. याच वेबसाइटवर अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. आयकर विभागात एकूण १०० पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२५ आहे.

आयकर विभागातील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ५६ वर्षे असावी. या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना ३५,४०० ते १,१२,४०० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना वाचा.

आयकर विभागाच्या अधिसूचनेत अर्ज कसा करायचा हे सांगितलं आहे. अर्जाची प्रत दिलेली आहे. हा अर्ज भरुन तुम्हाला आयकर आयुक्त, ७वा मजला, आयकर भवन, पुराना रेल्वे स्टेशन रोड, कोची ६८२०१८ येथे पाठवायचा आहे. (Income Tax Recruitment 2025)

पंजाब नॅशनल बँकेत भरती

सध्या पंजाब नॅशनल बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. बँकेत इंटरनल ओब्ड्समॅन पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ फेब्रुवारी २०२५ आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress : बेडरूम अन् इंटीमेट सीन; कट म्हटलं तरी हिरोला Kiss करत राहिली प्रसिद्ध अभिनेत्री, नेमकं घडलं काय?

Maharashtra News Live Update: महायुतीकडून भाजपाचे अमर राजुरकर यांना उमेदवारी

OBC आरक्षणात कपात होणार? निवडणूक आयोगाचे राज्य सरकारला आदेश, पाहा का घेतला निर्णय?

Vaibhav suryavanshi: 15 वर्षांचा वैभव सूर्यवंशी मालामाल, आलिशान कार आणि मिळाले तब्बल इतके लाख रूपये

Ladki Bahin Yojana : मे महिना संपला; लाडकीच्या खात्यात ₹१५०० कधी येणार? अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT