Income Tax Bharti Saam Tv
naukri-job-news

Income Tax Recruitment: आयकर विभागात नोकरी करण्याची संधी; पगार ३५००० रुपये; अशा पद्धतीने करा अर्ज

Income Tax Recruitment 2025: इन्कम टॅक्स विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. इन्कम टॅक्स विभागात लघुलेखक ग्रेड १ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

नोकरी शोधताय तर ही बातमी तुमच्यासाठी. आयकर विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. आयकर विभागात विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. (Government Job)

आयकर विभागात लघुलेखक ग्रेड १ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. याबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ५६ वर्षे असावे. एकूण ६२ रिक्त पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी लवकरात लवकर अर्ज करावेत. (Income Tax Recruitment)

या नोकरीसाठी आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि हैदराबाद येथे आयकर आयुक्त कार्यालयात तुम्हाला जावे लागणार आहे. ही निवड प्रतिनियुक्तीवर केली जात आहे.या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ एप्रिल २०२५ आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी मुख्य आयकर आयुक्त, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा, हैदराबाद,१०वा मजला, इन्कम टॅक्स टॉवर्स, ए सी गार्ड्स, मसाब टँक, हैदराबाद ५००००४ येथे अर्ज पाठवायचा आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना ३५४०० रुपये पगार मिळणार आहे.

NTPC मध्ये भरती

सध्या एनटीपीसीमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. जनरल मॅनेजर पदांसाठी ही भरती आहे. या नोकरीसाठी ६ मार्चपासून अर्जप्रक्रिया सुरु झाल्या आहेत. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ मार्च आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर १ लाख ते २,८०,००० रुपये पगार मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

Bigg Boss Marathi 6 Grand Finale : फिनालेच्या शर्यतीतून 'हा' स्पर्धक OUT, मास्टर माइंडचा खेळ संपला | VIDEO

SCROLL FOR NEXT