IIT Bombay Job Saam Tv
naukri-job-news

IIT Bombay Job : IIT बॉम्बेमध्ये नोकरी; १,४२,००० रुपये पगार; पात्रता आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

IIT Bombay Recruitment: आयआयटी बॉम्बेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. प्रोफेसर ते प्रायमरी टीचर या पदासाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत.

Siddhi Hande

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. आयआयटी बॉम्बे म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमध्ये विविध पदांसाठी भरती सुरु आहे. आयआयटीमध्ये स्टूडंट काउंसलर, टेक्निकल ऑफिसरपासून ते प्रायमरी टीचर अशा सर्व पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

इच्छुक उमेदवार आयआयटी बॉम्बेच्या अधिकृत वेबसाइट म्हणजेच www.iitb.ac.inवर जाऊन अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ ऑक्टोबर २०२४ आहे. मुदतीनंतर तुम्हाला अर्ज करता येणार नाही. (IIT Bombay Recruitment)

आयआयटी बॉम्बेमध्ये स्टूडंट काउंसलर, टेक्निकल ऑफिसर I,टेक्निकल सुपरिटेंडेट, ज्युनियर टीजीटी, ज्युनियर टीजीटी हिंदी,ज्युनियर टीजीटी आर्ट, ज्युनियर टीजीटी मराठी, ज्युनियर टीजीटी म्युझिक या पदांसाठी भरती सुरु आहे.

आयआयटी बॉम्बेमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी संबंधित क्षेत्रात ग्रॅज्युएट/B.Tech/B.E/M.Sc पदवी प्राप्त केलेली असावी. याबाबत सर्व माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

या नोकरीसाठी उमेदवारांना वेतन लेवल ५ ते लेवल १०नुसार दिले जाणार आहे. स्टुडंट काउंसलर, टेक्निकल ऑफिसर पदासाठी ५६,१०० ते १,७७,५०० रुपये, टेक्निकल सुपरिटेंडेंट आणि टीजीटी शिक्षकांसाठी ३५,४०० ते १,१२४०० रुपये मानधन मिळणार आहे. प्रायमरी टीचरला २९,२००० ते ९२,३०० रुपये मानधन मिळणार आहे. (IIT Bomaby Job)

रेल्वे भरती

सध्या रेल्वेमध्येदेखील भरती सुरु आहे. रेल्वे एनटीपीसीमध्ये ११ हजारांपेक्षा जास्त पदांसाठी भरती सुरु आहे. यातील ३ हजारांपेक्षा जास्त पदे अंडरग्रॅज्युएटसाठी आहे. अंडरग्रॅज्युएट पदासाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

Cyber Crime: बॅंकिग फ्रॉड टाळण्यासाठी 'या' टिप्स करा फॉलो

Ind Vs Eng 4th Test : मँचेस्टरमध्ये इंग्लंडचा रडीचा डाव? कसोटी जिंकण्यासाठी बॉल टॅम्परिंग? पाहा Viral Video

Shubman Gill : गिल दा मामला...! मँचेस्टर कसोटीत शुभमन गिलचे शतक, कॅप्टनने अनेक रेकॉर्ड मोडले

Gold Price: सोन्याची उसळी! सोन्याचा दर लवकरच 1 लाख 10 हजारांवर जाणार

SCROLL FOR NEXT