IDBI Recruitment Saam Tv
naukri-job-news

IDBI Recruitment: शिक्षण पूर्ण झालंय? IDBI बँकेत नोकरीची संधी; ६५० रिक्त जागा, पात्रता अन् अर्जप्रक्रिया जाणून घ्या

IDBI Recruitment 2025: आयडीबीआय बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. बँकेत ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर पदासाठी भरती सुरु आहे. ६५० रिक्त पदांसाठी भरती केली जाणार आहे.

Siddhi Hande

बँकेत सरकारी नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. जर तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर ही माहिती खास तुमच्यासाठी. आयडीबीआय बँकेत सध्या भरती सुरु आहे. आयडीबीआय बँकेत ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

बँकेत ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर पदासाठी ६५० जागा रिक्त आहेत. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया १ मार्चपासून सुरु होणार आहे. १ मार्च ते १२ मार्च २०२५ पर्यंत ही अर्जप्रक्रिया सुरु राहणार आहे. या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. www.idbibank.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. (IDBI Bank Recruitment)

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा कॉलेजमधून कोणत्याही स्ट्रीममध्ये ग्रॅज्युएशन केलेले असावे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा २० ते २५ वर्षे असायला हवी. या नोकरीसाठी आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

आयडीबीआय बँकेतील या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला १००० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना २५० रुपये भरावे लागणार आहे. (IDBI Bank job)

या नोकरीसाठी अर्ज केल्यानंतर उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षेद्वारे होणार आहे. ऑनलाइन टेस्टमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे मुलाखतीसाठी बोलावले जाईल. ऑनलाइन टेस्ट आणि मुलाखतीत पास झाल्यावरच उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

या नोकरीबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. विविध राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena Symbol: आमदारांनी वेगळी भूमिका घेतली तीच राजकीय फूट; शिंदे गटाचा जोरदार युक्तीवाद, वाचा सुनावणीतील महत्त्वाचे मुद्दे

Maharashtra News Live Update: आमदार राजेश पाडवी यांनी नाशिकमध्ये घेतली आंदोलक आदिवासी विद्यार्थ्यांची भेट

Old Pension Scheme : सरकारी कर्मचाऱ्यांची लॉटरी! जुनी पेन्शन योजना परत येणार; 'या' राज्य सरकारच्या निर्णयाने खळबळ

Jio Recharge: खुशखबर! फक्त 666 रुपयांमध्ये इतक्या दिवसांची वैधता, Jio चा जबरदस्त रिचार्ज प्लान

Election Commission: २०२९च्या लोकसभा निवडणुकीवेळी मोठा बदल होणार; मतदान केंद्रांची संख्या वाढणार, RTIमधून खुलासा

SCROLL FOR NEXT