IDBI Bank Job Saam Tv
naukri-job-news

IDBI Bank Job: IDBI बँकेत ऑफिसर होण्याची सुवर्णसंधी, तब्बल ६०० पदांसाठी भरती; अर्ज कुठे अन् कसा कराल?

IDBI Bank Recruitment: आयडीबीआय बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. आयडीबीआय बँकेत तब्बल ६०० पदांसाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत.

Siddhi Hande

बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आयडीबीआय बँकेत सध्या ऑफिसर पदांसाठी भरती सुरु आहे. आयडीबीआय बँकेने या भरतीबाबत अधिसूचना जाहीर केली आहे. या नोकरीसाठी अर्ज तुम्ही अधिकृत वेबसाइटवरुन करु शकतात. (IDBI Bank Recruitment)

आयडीबीआय बँकेमधील या नोकरीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया २१ नोव्हेंबरपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०४ आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

आयडीबीआय बँकेने ही एक्झिक्युटिव्ह सेल्स अँड ऑपरेशन (ESO) पदासाठी ही भरती केली जाणार आहे. असिस्टंट मॅनेजर (JAM), स्पेशलिस्ट (AAO)पदासाठी ही भरती केली जाणार आहे. असिस्टंट मॅनेजर पदासाठी अहमदाबाद, बंगळुरु, चंडीगढ, कोची, मुंबई, नागपूर, पुणे येथे भरती केली जाणार आहे. असिस्टंट मॅनेजर पदासाठी ५०० जागा रिक्त आहेत. स्पेशलिस्ट एग्री असेट ऑफिसर पदासाठी १०० जागा रिक्त आहेत. एकूण ६०० जागांवर ही भरती करण्यात येणार आहे. (IDBI Bank Recruitment 2024)

असिस्टंट मॅनेजर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे. तसेच ग्रेड ओ-एएओ स्पेशलिस्ट पदासाठी कृषी इंजिनियरिंग, मत्स्य विज्ञान, पशुपालन, डेअरी विज्ञान या विषयात पदवी प्राप्त केलेली असावी. याबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

आयडीबीआय बँकेच्या या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा २० ते २५ वर्ष असावी. या नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवारांना २५० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.या नोकरीसाठी उमेदवारांची निवड ऑनलाइन टेस्ट, कागदपत्रे पडताळणी, मुलाखत आणि प्री रिक्रूटमेंट मेडिकल टेस्टद्वारे केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भीमाशंकरची महादेव नगरी सजली, भाविक शिवभक्तीत तल्लीन

Gaza News Today : गाझात उपासमारीने 124 जणांचा मृत्यू; 50 ग्रॅमचं बिस्किट 750 रुपयांना, VIDEO

Monday Horoscope : गणरायाची कृपा होणार,अचानक मोठा पैसा मिळवाल; ५ राशींचे लोक ठरणार भाग्यवान, वाचा राशीभविष्य

श्रावण सोमवारी पहाटे दुर्घटना, मंदिरात विजेची तार तुटल्याने चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू, 38 भाविक जखमी

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

SCROLL FOR NEXT