High Court Job Saam Tv
naukri-job-news

High Court Job: उच्च न्यायालयात नोकरीची सुवर्णसंधी; मिळणार भरघोस पगार; पात्रता आणि अर्जप्रक्रिया जाणून घ्या

High Court Recruitment 2024: उच्च न्यायालयात सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. ज्यूडिशियल असिस्टंट पदासाठी ही भरती केली जाणार आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मध्य प्रदेश उच्च न्यायालयात सध्या नोकरीची सुवर्णसंधी आहे. मध्य प्रदेश उच्च न्यायालयात ज्यूडिशियल असिस्टंट पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. याबाबत उच्च न्यायालयाने अधिसूचना जाहीर केली आहे.

ज्यूडिशियल असिस्टंट पदासाठी ४० जागा रिक्त आहेत. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

उच्च न्यायालयातील या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑक्टोबर २०२४ आहे. या नोकरीसाठी अर्ज दाखल केल्यानंतर जर काही बदल असतील तर ते १८ ते २० ऑक्टोबरपर्यंत करु शकतात. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड कॉम्प्युटर बेस्ड लेखी परीक्षेद्वारे केली जाणार आहे. त्यानंतर कागदपत्र पडताळणी केली जाणार आहे.

या नोकरीसाठी उमेदवाराने कोणत्याही विषयात पदवी प्राप्त केली असावी. त्याचसोबत बोर्ड ऑफ ज्यूडिशियल शॉर्टहँड किंवा टाइपरायटिंगची परीक्षा पास केलेली असावी. या नोकरीसाठी १८ ते ३५ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.

या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ९४३.४० रुपये शुल्क भरावे लागणार आहे तर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना ७९४ रुपये शुल्क भरावे लागणार आहे. (High Court Job)

ओएनजीसीमध्ये भरती (ONGC Recruitment)

सध्या ओएनजीसीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. ओएनजीसीमध्ये २००० हून अधिक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. अप्रेंटिस पदासाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना स्टायपेंड दिली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT