naukri-job-news

Zilla Parishad Recruitment: १२ वी पास तरुणांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी;जिल्हा परिषदेत या पदासाठी सुरु आहे भरती; जाणून घ्या सविस्तर

Zilla Parishad Recruitment 2024: जिल्हा परिषदेत नोकरीची सुवर्णसंधी आहे. जिल्हा परिषदेत डेटा एन्ट्री ऑपरेटर या पदासाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करायचे आहेत.

Siddhi Hande

जिल्हा परिषदेत नोकरीची सुवर्णसंधी आहे. जिल्हा परिषद, शिक्षण विभागाअंतर्गत डेटा एन्ट्री ऑपरेटर या पदासाठी भरती केली जाणार आहे. १२ वी पास उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करावे. या भरतीची जाहिरात जिल्हा निवड प्रक्रिया समितीद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या अधिकृत वेबसाइटवर तुम्ही ही जाहिरात पाहू शकता.

डेटा एन्ट्री ऑपरेटर या पदासाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी १२ वी पास उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना २०,६५० रुपये मासिक वेतन देण्यात येणार आहे.

या नोकरीसाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. १८ ते ३४ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.११ महिन्यांच्या कंत्राटी पदासाठी ही भरती केली जाणार आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे १२ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झालेले असावे. त्यांनी इंग्रजी, मराठी टंकलेखनचा कोर्स केलेला असावा. त्यांनी MSCIT किंवा कोणतीही संगणक परीक्षा पास केलेली असावे. या नोकरीसाठी ४ पदे भरण्यात येणार आहे. धुळे जिल्हा परिषदेत या नोकरीसाठी भरती सुरु आहे.

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड १२ वी परीक्षेत मिळालेले गुण आणि टायपिंग परीक्षेद्वारे केली जाईल. ज्यात उमेदवारांना मराठी आणि इंग्रजी टायपिंग करण्यास सांगितले जाईल. २० जुलै २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.या नोकरीसाठी तुम्ही शिक्षण विभाग, जिल्हा परिषद धुळे येथे अर्ज पाठवू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी! बंद झालेला ₹1500 चा हप्ता पुन्हा सुरू होणार, आदिती तटकरेंनी दिली अपडेट

Maharashtra News Live Update:एसआयआर मोहिमेदरम्यान महिला बीएलओला धक्काबुक्की, मायलेकीवर गुन्हा दाखल

Marathi Actress : 'वीण दोघांतली ही तुटेना' फेम अभिनेत्रीने खरेदी केली लग्जरी कार, नव्याकोऱ्या गाडीसोबत शेअर केला PHOTO

Crime News: स्मार्ट सिटी दाखवतो म्हणत सोबत नेलं, खोलीत कोंडून ठेवत ४ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार नंतर...

अमरावतीत भरदिवसा थरार! तरुणाची निर्घृण हत्या, हाताचा पंजाच छाटल्याने उडाली खळबळ

SCROLL FOR NEXT