Zilla Parishad Job Saam Tv
naukri-job-news

Zilla Parishad Job: तरुणांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, जिल्हा परिषदेत बंपर भरती; आजच करा अर्ज

Zilla Parishad Recruitment : जिल्हा परिषदमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. जिल्हा परिषदमध्ये वेगवेगळ्या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी तुम्हीदेखील अर्ज करु शकतात.

Siddhi Hande

जिल्हा परिषद, सामान्य प्रशासन विभागात रिक्त पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे. सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांनी या नोकरीसाठी अर्ज करावेत. या भरतीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

तरुणांना जिल्हा परिषदमध्ये काम करण्यासाठी संधी उपलब्ध आहे. राज्य सरकारच्या मान्यतेनंतरच ही भरती करण्यात येणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना ३५ हजार रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे.

जिल्हा परिषदेत भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत. वकील आणि कायदा सल्लागार या पदासाठी ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी उमेदवाराचे एल.एल.बी किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षण झाले असावे. या नोकरीसाठी एकूण १ पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही नोकरीची संधी मिळणार आहे. ही भरती ११ महिन्यांसाठी आहे.

ही पदभरती कंत्राटी पद्धतीने केली जाईल. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ जुलै २०२४ आहे. या नोकरीसाठी तुम्हाला उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद विभाग, आर्णी रोज, जिल्हा परिषद यवतमाळ येथे अर्ज पाठवायचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT