Government Job Saam Tv
naukri-job-news

Government Job: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार सरकारी नोकरी; महिना ६०,००० रुपये पगार; अर्ज कुठे अन् कसा करावा?

IGNOU Recruitment 2025: सरकारी नोकरीची संधी तरुणांकडे आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात सध्या विविध पदांसाठी भरती सुरु आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरी शोधताय तर ही बातमी खास तुमच्यासाठी. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. विविध विभागात ही भरती केली जाणार आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय विद्यापीठात कंस्ट्रक्शन आणि मेंटेनेंस डिवीजनमध्ये भरती जाहीर करण्यात आली आहे.

इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठात कंसल्टंट, सीनियर कंसल्टंट, अॅडमिनिस्ट्रेटिव्ह असोसिएट या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइट ignou.ac.in वर जाऊन अर्ज करु शकतात.

कंसल्टंट पदासाठी १ जागा रिक्त आहे. सिनियर कंसल्टंटसाठी १ जागा, अॅडमिनिस्ट्रेटिव्ह असोसिएट पदासाठी १ जागा रिक्त आहे. या नोकरीसाठी तुम्ही २० एप्रिलपर्यंत अर्ज करु शकतात.

कंसल्टंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.E./B.Tech (सिविल/इलेक्ट्रिकल)पदवी प्राप्त केलेली असावी. सिनियर कंसल्टंट (अॅडमिनिस्ट्रेटिव्ह) पदासाठी ग्रॅज्युएशन केलेले असावे. अॅडमिनिस्ट्रेटिव्ह असोसिएट पदासाठी ग्रॅज्युएशन आणि इंग्लीश टायपिंग स्पीडचा कोर्स केलेला असावी. एम.एस. ऑफिस यायला हवे. या नोकरीसाठी तुम्हाला ६०००० रुपये पगार मिळणार आहे.

सिनियर कंसल्टंट पदासाठी उमेदवारांना बायोडाटा, कागदपत्रे acdadmin@ignou.ac.in या मेलवर पाठवायचे आहे. कंसल्टंट पदासाठी तुम्हाला वेबसाइटवर जाऊन फॉर्म डाउनलोड करायचा आहे. तो भरुन डेप्युटी रजिस्टर, रिक्रूटमेंट सेल, ब्लॉक ७, रुम नं १३, IGNOU,मैदानगडी, नवी दिल्ली-११००६८ येथे पाठवायचा आहे.

सध्या सीएसआरआर- भारत पेट्रोलियम संस्थेत भरती

सध्या सीएसआरआर आयआयपीमध्येही भरती सुरु आहे. शास्त्रज्ञ पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. ९ पदांसाठी ही भरती आहे. या नोकरीसाठी तुम्ही ५ मे २०२५ पर्यंत अर्ज करु शकतात.या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने एम.ई/एम.टेकसोबत पीएचडी केलेली असावी.चांगल्या सरकारी कंपनीत नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video:भाच्याच्या लग्नात मामाचा मृत्यू, बेफाम डान्स करताना अचानक कोसळले अन्...!

Maharashtra Live News Update : दहिसरहुन गुंदवलीला येणाऱ्या मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड

राज्यकर्ते गावात आल्यावर त्यांना रट्टे...; मनोज जरांगेंचा सरकारवर जोरदार हल्लाबोल, काय म्हणाले? VIDEO

Dombivli : डोंबिवलीत डॉक्टर-वकिलांच्या घरांची आधी 'रेकी', मग धाडसी घरफोडी; दरोडेखोरांचा थरार सीसीटीव्हीत कैद

Tooth Pain Relief: दात दुखतोय? हे घरगुती वापरा, काही मिनिटांत मिळेल आराम

SCROLL FOR NEXT