Government Job Saam Tv
naukri-job-news

Government Job: तरुणांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी;मिळणार १ लाख २० हजार रुपये पगार; पात्रता आणि अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

Government Job: तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. ज्या तरुणांचे शिक्षण झाले आहे आणि नोकरीच्या शोधात आहे त्यांनी या नोकरीसाठी लवकरात लवकर अर्ज करावेत.

Siddhi Hande

तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. उत्तर प्रदेश युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायन्स येथे अनेक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ ऑगस्ट २०२४ आहे. या नोकरीबाबत सर्व माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

UPUMS च्या भरती मोहिमेद्वारे एकूण ८२ पदांसाठी भरती केली जाणार आहे. यामध्ये स्टेनोग्राफर ते फार्मासिस्ट ग्रेड II, कनिष्ठ वैद्यकीय रेकॉर्ड ऑफिसर, ज्युनिअर फिजिओथेरेपिस्ट या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी अंतिम तारीख २४ ऑगस्ट २०२४ आहे.

या नोकरीसाठी वरिष्ठ प्रशासकीय सहाय्यक पदांसाठी ३० पदे रिक्त आहे. स्टेनोग्राफर पदासाठी ३० पदे रिक्त आहेत. ज्युनिअर मेडिकल रेकॉर्ड ऑफिसर पदासाठी ३ जागा रिक्त आहे. फार्मासिस्ट ग्रेड २ साठी १० पदे रिक्त आहेत.तर ज्युनिअर फिजियोथेरेपिस्ट पदासाठी ५ जागा रिक्त आहेत तर ज्युनिअर ऑक्यूपेशनल थेरेपिस्ट या पदासाठी ४ जागा रिक्त आहेत.

या पदांसाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. यामध्ये सीनियर अॅडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट पदासाठी ग्रॅज्युएशन केलेले असणे गरजेचे आहे. त्याचसोबत त्यांना टायपिंग येणे गरजेचे आहे. ज्युनिअर मेडिकल ऑफिसर पदासाठी १२ वी पास उमेदवार आणि संबंधित क्षेत्रात ६ महिन्यांचा सर्टिफिकेट कोर्स केलेला असावा.

या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल. यासाठी तुम्हाला upums.ac.in या साइटवर जाऊन अर्ज करावा लागेल. या नोकरीसाठी उमेदवारांना परीक्षा द्यावी लागणार आहे. या नोकरीसाठी उमेदवाराचे वय १८ ते ४० वर्ष असावे. या नोकरीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पे स्केल ४ ते ६ पर्यंत असेल. उमेदवारांना २५ हजार ते १ लाख १२ हजार रुपये मासिक वेतन मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात राजस्थानच्या तिघांकडून ७८ हजारांचे अफीम जप्त; तस्करीचे रॅकेट उघडकीस

आमदारांच्या पाहणी दौऱ्यात सुपरवायझरला मारहाण; भाजप नेत्यासह चौघांवर गुन्हा दाखल; राज्यात खळबळ

Pathology lab reports: रिपोर्टवर सही करणारे डॉक्टर प्रत्यक्षात तपासणी करतात का? ‘घोस्ट पॅथॉलॉजिस्ट’ प्रकारामुळे रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

Turmeric Price : मोठी बातमी! हळदीने गाठला विक्रमी उच्चांक; ९ वर्षांनंतर भाव थेट 'तितक्या' हजारांवर

Sabudana Vada Recipe : १० मिनिटांत बनवा कुरकुरीत साबुदाणा वडे, पाहा सोपी ट्रिक

SCROLL FOR NEXT