UIICL Recruitment 2024 Saam Tv
naukri-job-news

Government Job: सरकारी नोकरीची संधी; UIICL मध्ये भरती सुरु; पगार ८८,०००; पात्रता आणि अर्जप्रक्रिया जाणून घ्या

UIICL Recruitment 2024: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. युनायटेड इंडिया इन्शुरन्स लिमिटेडमध्ये अधिकारी होण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमध्ये सध्या विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. २०० रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उनेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमधील नोकरीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. प्रशासकीय अधिकारी स्केल I पदासाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ नोव्हेंबर २०२४ आहे. (United India Insurance Limited Recruitment)

युनायटेड इंडियामधील प्रशासकीय अधिकारी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून इंजिनियरिंग पदवी/ पदव्युतर पदवी /B.Com/M.Com/PG/PGDM (Risk Management) पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

युनायटेड इंडिया इन्शुरन्स लिमिटेड या कंपनीत नोकरीसाठी ८८,००० रुपये पगार मिळणार आहे. नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्रात नोकरी करावी लागणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ नोव्हेंबर आहे. इच्छुक उमेदवारांनी मुदतीपूर्वी अर्ज करावेत. (UIICL Recruitment 2024)

सरकारी बँकेत नोकरी (Government Job)

सध्या नॅशनल हाउसिंग बँकेत मॅनेजर आणि डेप्युटी मॅनेजर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना वेतन श्रेणीनुसार मानधन दिले जाणार आहे. २३ ते ३५ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ७८,२३० रुपये वेतन मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - तुळजापूर डान्स प्रकरण : जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त

धाराशिव दौऱ्यात संजय राऊतांनी खाल्ले काजू, बदाम; कुणी केला दावा? | VIDEO

Shocking News : तरूणीसोबत घडली विचित्र घटना, बाथरूममध्ये आंघोळीला गेली अन् कोपऱ्यातलं दृश्य बघून हादरलीच!

निवडणुकीचं बिगुल वाजलं! माजी मुख्यमंत्र्यांच्या पक्षाची पहिली यादी जाहीर, प्रसिद्ध गायकाला मिळाली उमेदवारी

Relationship Tips: सारखं भांडण होतं; नातं घट्ट करण्यासाठी जोडीदारानं कराव्यात या खास गोष्टी

SCROLL FOR NEXT