Government Job Saam TV
naukri-job-news

SAIL Recruitment: स्टील ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी; या पदासाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

SAIL Recruitment 2024: स्टील ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. स्टील ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये नर्सिंग पदासाठी भरती केली जाणार आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. स्टील ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. सेल ऑथोरिटी ऑफ इंडियामधील नोकरीसाठी तुम्ही ५ डिसेंबरपर्यंत अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड कोणत्याही परिक्षेशिवाय केली जाणार आहे. (SAIL Recruitment)

स्टील ऑथोरिटी ऑफ इंडियामधील या नोकरीसाठी तुम्ही अर्ज करु शकतात. स्टील ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये नर्सिंग पदासाठी ही भरती केली जाणार आहे.त्यामुळे बीएससी नर्सिंगचा कोर्स केलेल्या उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे.याबाबत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना वाचावी. (SAIL Recruitment 2024)

स्टील ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये ५१ पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून बीएससी नर्सिंग/जनरल नर्सिंग अँड मिडफाइफरीमध्ये डिप्लोमा केलेला असावा. त्याचसोबत इंटर्नशिप किंवा रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ३० वर्ष असावी. या ट्रेनिंग प्रोग्रामसाठी उमेदवारांना १०,००० रुपये स्टायपेंड दिली जाणार आहे. त्याचसोबत ७०२० नॉलेज इनहेंसमेंट अलाउंस पण देण्यात आले आहे.या नोकरीसाठी उमेदवारांची निवड इंटरव्ह्यूद्वारे केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री होऊ नये - रामदास आठवले

Maharashtra CM : लोकसभेलाच डील, एकनाथ शिंदेच होणार मुख्यमंत्री; CM च्या जवळच्या नेत्याचा दावा

Pune Crime: चितेजवळ सापडलेल्या लाकडावरील रक्तावरून हत्येचा छडा, वाईट नजरेने बघत असल्याने काढला काटा

Narsayya Adam : विधानसभेत चौथ्यांदा पराभव; माजी आमदार आडम यांची राजकारणातून निवृत्ती

Disha Patani: दिशाचा हॉटनेस पाहून म्हणाल, आला थंडीचा महिना, झटपट...

SCROLL FOR NEXT