Government Job Google
naukri-job-news

Government Job: परीक्षा न देता मिळणार सरकारी नोकरी अन् २४ लाख रुपयांचे पॅकेज; या विभागात सुरु आहे भरती

RITES Recruitment: सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. नवरत्न सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्राइज राइट्स लिमिटेडने मोठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी उमेदवारांना २४ लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज मिळू शकते.

Siddhi Hande

रेल्वे मंत्रालयाअंतर्गत कार्यरत नवरत्न सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्राइज राइट्स लिमिटेड ने विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे. कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाइटवर म्हणजेच www.rites.com वर याबाबत अधिसूचना जारी केली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. २६ जुलै २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

RITES लिमिटेडने प्रोजेक्ट लीडर, टीम लीडर, डिझाइन एक्सपोर्ट, इंजिनियर यांच्या विविध ट्रेडमधील रिक्त पदांसाठी भरती सुरु केली आहे. यामध्ये प्रोजेक्ट लीडर, टीम लीडर, डिझाइन एक्सपोर्ट, इंजिनियर या पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी संबंधित क्षेत्रातील डिप्लोमा/ पदवी असणे आवश्यक आहे. याचसोबत उमेदवाराच्या कामाच्या अनुभवाचाही विचार घेण्यात येईल. या क्षेत्रातील अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. या नोकरीसाठी सर्व माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

या नोकरीसाठी उमेदवाराची वयोमर्यादा कमाल ५५ वर्ष असावी. या नोकरीसाठी निवड मुलाखतीद्वारे घेतली जाणार आहे. या नोकरीसाठी कोणतीही लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही. २२ जुलै ते २६ जुलै या कालावधीत मुलाखत होणार आहे. मुलाखतीच्या ठिकाणाची माहिती वेबसाइटवर देण्यात आली आहे. ही भरती कंत्राटी पद्धतीने केली जाणार आहे. यामध्ये कामाचा कालावधी एक वर्षाचा असेल. या पदांसाठी उमेदवारांना ८.४७ लाख रुपये ते २४.५४ लाख रुपये वार्षिक पॅकेज दिले जाणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SA 1st T20I: नाद करा पण आमचा कुठं! वर्ल्ड चॅम्पियन भारताचा दक्षिण आफ्रिकेला दणका

Supriya Sule Speech : पोर्शे कार अपघात प्रकरणात बदनामी केल्यामुळे शरद पवारांना नोटीस; सुप्रिया सुळेंचा भरसभेत गौप्यस्फोट

6,6,6,6,6...द.आफ्रिकेत Sanju Samsonचं वादळ! असा रेकॉर्ड करणारा ठरला पहिलाच भारतीय फलंदाज

IND vs SA 1st T20I: दक्षिण आफ्रिकेत संजू सॅमसन शो.. दमदार अर्धशतकासह मोडला मोठा रेकॉर्ड

Raj Thackeray Speech : सूरत-गुवाहाटी, पहाटेचा शपथविधी, शिवसेना; राज ठाकरेंची एकाच सभेत ठाकरे, पवार, शिंदे, फडणवीसांवर तोफ

SCROLL FOR NEXT