Government Job Saam Tv
naukri-job-news

Government Job: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये भरती सुरु; अर्ज कसा करावा?

National Seeds Corporation Limited Recruitment: तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती सुरु आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २६ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये उप महाप्रबंधक, सहायक प्रबंधक, एचआर पदांसाठी भरती केली जाणार आहे. वेगेवगेळ्या विभागात ही भरती केली जाणार आहे. १८८ रिक्त पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२४ आहे. (Government Job)

या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी indiaseeds.com या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी संबंधित क्षेत्रात आयटीआय, डिप्लोमा, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा केलेला असावा. या नोकरीसाठी वयोमर्यादा पदानुसार वेगवेगळी आहे.

या नोकरीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवरुन अर्ज करायचा आहे. वेबसाइटवर तुम्हाला अर्जासंबंधित लिंक दिसेल. त्यावर क्लिक करुन फॉर्म भरावा लागेल. अर्ज शुल्क भरल्यानंतर तुमची प्रोसेस पूर्ण होणार आहे. त्यानंतर तुम्ही प्रिंट आउट काढून तुमच्याजवळ ठेवा. (NSCL Recruitment)

यूनियन बँकेत भरती

सध्या यूनियन बँकेतदेखील भरती सुरु आहे. यूनियन बँकेत १५०० पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. लोकल बँक ऑफिसर या पदासाठी भरती होणार आहे. त्यामुळे बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी ही चांगली संधी आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs NZ 2nd Test: सँटनरची 'सुंदर' गोलंदाजी! 7 विकेट्स घेत टीम इंडियाला केलं All Out; न्यूझीलंडकडे मोठी आघाडी

Maharashtra News Live Updates: 'सहाव्यांदा दक्षिण पश्चिमची जनता आशीर्वाद देणार..' देवेंद्र फडणवीसांना विश्वास

Indrayani: इंदू आणि फंट्या गँगने बनवला मातीचा किल्ला, 'इंद्रायणी' मालिकेत साजरी होणार अनोखी दिवाळी

Camphor Benefits: घरात कापूर पाणी शिंपडल्याने होतात अनेक फायदे!

Aus vs Tasmania: ऐकावं ते नवल! १ धाव अन् ८ फलंदाज तंबूत; ७ फलंदाज तर शून्यावर बाद

SCROLL FOR NEXT