Government Job Saam Tv
naukri-job-news

Government Job: परीक्षा न देताच सरकारी नोकरीची मोठी संधी; NMDC मध्ये शिकाऊ पदांसाठी भरती; जाणून घ्या सविस्तर

NMDC Apprentice Job: सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी चांगली संधी आहे. NMDC मध्ये भरती सुरु आहे. जर तुमचे शिक्षण पूर्ण झाले असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करु शकतात.

Siddhi Hande

जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. तुम्ही परीक्षा न देताच सरकारी नोकरी मिळवू शकतात. नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये अनेक नोकरीच्या संधी उपलब्ध आहे. NMDC मध्ये शिकाऊ उमेदवारांची भरती सुरु आहे. ही भरती मुलाखतीच्या आधारे केली जाणार आहे. याबाबत रिक्त पदासाठी १४ जून २०२४ रोजी अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये वेगवेगळ्या पदासाठी नोकरीची संधी आहे.

NMDC Limited मध्ये १ जुलैपासून पदवीधर शिकाऊ, तंत्रज्ञ यांसाठी नोकरीची संधी आहे. या उमेदवारांसाठी १ जुलैपासून मुलाखतीचे आयोजन केले जाईल. यामध्ये ट्रेड अपरेंटिस, स्नातक अपरेंटिस आणि तंत्रज्ञ अपरेंटिससाठी रिक्त पदे आहे.

ITI शिकाउ उमेदवारांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे NVCT/SCVT द्वारे मान्यताप्राप्त आयआयटीचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. तर ग्रॅज्युएच अप्रेंटिसशिपसाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ/ अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानातील पदवी असणे गरजेचे आहे. याशिवाय टेक्निशियम डिप्लोमा अप्रेंटिसशिपसाठी उमेवाराकडे सरकारी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारावर केली जाणार आहे. यासाठी उमेदवारांना NAOS पोर्टलवर स्वतः ला रजिस्टर करावे लागेल. यासाठी त्यांना www.apprenticeshipindia.gov.in साइटवर जाऊन अर्ज करावा लागेल. या नोकरीसाठी अर्जदारांना किमान १ वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे. या पदांसाठी उमेदवाराचे वय किमान १६ वर्ष असावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तमिळनाडूचं राजकारण मोक्याच्या क्षणी फिरलं; थलपती विजय यांनी केलं मॅजिक, मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होणार?

Maharashtra News Live Update: रत्नागिरीत पाऊस, वादळी वा-यासह अवकाळी पावसाची हजेरी

Trendy Simple Mangalsutra: ऑफिस किंवा रोजच्या वापरासाठी ट्राय करा लाइटव्हेट आणि साधे ट्रेंडी मंगळसूत्र डिझाईन्स

TCS Case: घरात बुरखा आणि धार्मिक पुस्तके सापडणे कधीपासून अवैध झाले? असदुद्दीन ओवेसींकडून निदा खानचं समर्थन

Kitchen Hack : उन्हाळ्यात मडक्यात पाणी पिताय? थांबा त्यापूर्वी 'हे' आधी करा

SCROLL FOR NEXT