Government Job Saam Tv
naukri-job-news

Government Job: ७ वी पास तरुणांसाठी मुंबई उच्च न्यायलयात नोकरीची सुवर्णसंधी; पगार ५२४००; अर्ज कसा करावा?

Mumbai High Court Recruitment: मुंबई उच्च न्यायालयात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. उच्च न्यायलयात शिपाई पदासाठी ही भरती जाहीर केली आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. मुंबई उच्च न्यायलयाच्या आस्थपनेवर नवीन पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.मुंबई उच्च न्यायालयात शिपाई पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

मुंबई उच्च न्यायालयात ७वी, १०वी आणि १२वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

मुंबई उच्च न्यायालय खंडपीठाअंतर्गत ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास मराठी भाषा बोलता वाचता आणि लिहता .याशिवाय उमेदवार शारिरिकदृष्ट्या सक्षम, सुदृढ असणे गरजेचे आहे. मुंबई उच्च न्यायालयातील या नोकरीसाठी निवड झाल्यास उमेदवारांना १६,६०० ते ५२,४०० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

मुंबई उच्च न्यायलयातील या नोकरीसाठी ४५ जागा भरती केली जाणार आहे. १८ ते ४३ वयोगटातील उमेदवारांनी या नोकरीसाठी अर्ज करा. नागपूर येथे नोकरीसाठी जावे लागणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणारा उमेदवार महाराष्ट्रातील रहिवासी असावा.

मुंबई उच्च न्यायालयातील या नोकरीसाठी अर्ज करणारा उमेदवार https://bombayhighcourt.nic.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे.या नोकरीसाठी अर्ज केल्यानंतर उमेदवारांना अर्जाची प्रिंट आउट काढायची आहे. त्यानंतर अर्ज आणि कागदपत्रे घेऊन जायचे आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ मार्च २०२५ आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

Apoorva Nemalekar : “प्रवास सोपा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

Rupali Bhosle: 'रूप तेरा मस्ताना' रूपाली भोसलेचे फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल...

SCROLL FOR NEXT