Mazagaon Dock Job Saam Tv
naukri-job-news

Mazgaon Dock Job: माझगाव डॉकमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; मिळणार ८३००० रुपये पगार; पात्रता काय? जाणून घ्या

Mazgaon Dock Recruitment: माझगाव डॉकमध्ये सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. माझगाव डॉकमध्ये नॉन एक्झिक्युटिव्ह पदासाठी भरती सुरु आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. माझगाव डॉकमध्ये नॉन एक्झिक्युटिव्ह पदासाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे.

माझगाव डॉकमधील नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ डिसेंबर २०२४ आहे. इच्छुक उमेदवारांनी मुदतीपूर्वी अर्ज करावेत.

या नोकरीसाठी तुम्ही mazagondock.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. डिग्री, डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट कोर्स केलेल्या तरुणांसाठी नोकरीची ही सुवर्णसंधी आहे.

माझगाव डॉकमधील नॉन एक्झिक्युटिव्ह पदासाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी, डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट प्राप्त केलेले असावे. या नोकरीसाठी १८ ते ३८ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी वयोमर्यादेची गणना १ नोव्हेंबर २०२४ नुसार होणार आहे. (Mazgaon dock Recruitment 2024)

अर्ज कसा करावा? (Mazgaon Dock Job Application Process)

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने सर्वप्रथम mazagondock.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा लागेल.

वेबसाइटवर तुम्हाला ऑनलाइन रिक्रूटमेंट यावर क्लिक करुन नॉन एक्झिक्युटिव्ह सेक्शनवर क्लिक करा.

यानंतर रजिस्ट्रेशन लिंकवर क्लिक करावे.

यानंतर सर्व माहिती भरुन अर्जप्रक्रिया पूर्ण करावे.अर्ज केल्यानंतर त्याची प्रिंट आउट काढून तुमच्याजवळ ठेवा.

या नोकरीसाठी सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ३५४ रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. या नोकरीसाठी स्पेशल ग्रेड पदासाठी २२००० ते ८३१८० रुपये पगार मिळणार आहे. स्किल ग्रेड १ पदासाठी १७००० ते ६४३६० रुपये पगार मिळणार आहे. सेमी-स्कील ग्रेड १ पदासाठी १३२०० ते ४९९१० रुपये पगार मिळणार आहे.या नोकरीसाठी तुम्ही लवकरात लवकर अर्ज करावेत. (Government Job)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Denver Airport Incident : १७३ प्रवाशांना घेऊन येणाऱ्या विमानाच्या लँडिंग गियरला आग, अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली | Video

Kharadi Rave Party : मोठी बातमी! पुण्यातील रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या नवऱ्याला अटक, राज्यात खळबळ

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

स्प्रे मारून बेशुद्ध, शेतात नेत अत्याचार अन् बांधून टाकलं; बीडमध्ये अल्पवयीन मुलीसोबत भयंकर कृत्य | Beed News

Sabudana Laddu Recipe: श्रावणात उपवासाला झटपट बनवा 'साबुदाणा लाडू', ही रेसिपी एकदा वाचाच

SCROLL FOR NEXT