Government Job Google
naukri-job-news

Job: चौथी पास ते पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी; मडगाव नगरपालिकेत सुरू आहे भरती; जाणून घ्या सविस्तर

Madgaon Nagarpalika Recruitment 2024: सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मडगाव नगरपालिकेत सध्या विविध पदांसाठी भरती सुरु आहे.

Siddhi Hande

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. मडगाव नगरपालिकेअंतर्गत सध्या भरती सुरु आहे. मडगाव नगरपालिकेतील या भरतीसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. १३ रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे.

मडगाव नगरपालिकेतील या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ नोव्हेंबर २०२४ आहे.या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. (Government Job)

मडगाव नगरपालिकेत कनिष्ठ विभाग लिपिक, साइट सुपरवायजर, सहाय्यक गवंडी या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. कनिष्ठ विभाग लिपिक पदासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी. साइट सुपरवायजर पदासाठी १०वी पास असणे गरजेचे आहे. तसेच सहाय्यक गवंडी पदासाठी चौथी पास उमेदवार अर्ज करु शकतात.

या नोकरीसाठी तुम्ही मडगाव नगरपालिकेत जाऊन ऑफलाइन पद्धतने अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ नोव्हेंबर २०२४ आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. (Madgaon Nagarpalika Recruitment)

नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड भरती

सध्या नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमध्येही नोकरीची उत्तम संधी आहे. एनआयसीएलमध्ये तब्बल ५०० पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. असिस्टंट पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ नोव्हेंबर २०२४ आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gondia News : आमदार चंद्रिकापुरे यांचा तिसऱ्या आघाडीत प्रवेश; मोरगाव अर्जुनीत तिरंगी लढत होण्याची शक्यता

Maharashtra News Live Updates: शेकापचे जयंत पाटील घेणार शरद पवारांची भेट

Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरला मिळणार पूर्ण राज्याचा दर्जा? केंद्र सरकार मोठ्या तयारीत; वाचा सविस्तर माहिती

IND vs NZ, 2nd Test, Day 1: पहिल्या दिवसाचा खेळ संपला, १६ धावांवर टीम इंडियाने गमावली १ विकेट

Maharashtra Election : मोठी बातमी! राज्यात मतदानाच्या दिवशी सुट्टी, नेमकी कुणाला मिळणार?

SCROLL FOR NEXT