Government Job Saam Tv
naukri-job-news

Government Job: जलसंपदा विभागात नोकरीची सुवर्णसंधी; विविध पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या सविस्तर

Jalsampada Vibhag Bharti: महाराष्ट्र राज्याच्या जलसंपदा विभागात सध्या भरती सुरु आहे. अभियंता पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. सरकारी नोकरी करण्याची ही चांगली संधी आहे.

Siddhi Hande

चांगल्या पगाराची आणि सरकारी विभागात नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. जर तुम्हीही नोकरी शोधत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी. जलसंपदा विभागात विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीबाबत जाहिरात महाराष्ट्र शासन, कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभागाद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.

जलसंपदा विभागात सहाय्यक अभियंत्रा श्रेणी २/ शाखा अभियंता/ कनिष्ठ अभियंता या पदासाठी भरती जाहीर केली आहे.या पदासाठी सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी वयोमर्यादा ६५ वर्ष निश्चित करण्यात आली आहे. जलसंपदा विभागातील या नोकरीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. (Government Job)

जलसंपदा विभागात नोकरी करुन सेवानिवृत्त झालेले लोक या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. छत्रपती संभाजी नगर पाठबंधारे विभागात भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड १ वर्षांच्या कालावधीसाठी केली जाणार आहे.या नोकरीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना मुलाखतीबाबत ईमेलवर माहिती दिली जाईल.

या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी कार्यकारी अभियांता, नांदूर मधमेश्वर कालवा विभाग क्रं २, मुख्यालय छत्रपती संभाजी नगर, जलसंपदा विभाग येथे पाठवायचा आहे. (Jalsampada Vibhag Bharti)

NCERT मध्ये नोकरी

सध्या राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेत नोकरीची सुवर्णसंधी आहे. रिसर्च असोसिएट पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा ३५ वर्षे असावी. या नोकरीसाठी निवड झाल्यास उमेदवारांना ५८००० रुपये पगार मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ऑपरेशन टायर हाणून पाडण्यासाठी ठाकरेंचा शेवटचा डाव, २ आमदार अचानक ओमराजेंच्या घरी दाखल; मध्यरात्री काय घडलं?

Coffee Tips : कॉफी पिण्याची योग्य वेळ काय? तुम्हाला माहितीये का?

६ मतदारसंघ, एकच लक्ष्य; बंडखोरांविरोधात ठाकरेंची मोहीम, संपूर्ण दौऱ्याचे वेळापत्रक आले समोर

Today Horoscope : 'या' ४ राशींना आज नोकरी-व्यवसायात मिळणार गुड न्यूज; वाचा तुमचे राशिभविष्य

Yoga For Acidity: सतत Acidity चा त्रास होतोय? हे १ योगासन करेल तुमच्या सगळ्या समस्या दूर

SCROLL FOR NEXT